फोटो सौजन्य : X
आयपीएल संपल्यानंतर मेजर ली क्रिकेट सुरू आहे. यामध्ये अनेक दिग्गज खेळाडू हे सामील झाले आहेत. मेजर लीग क्रिकेटमध्ये सहा संघ सहभागी झाले आहेत यामध्ये 34 सामने खळवले जाणार आहेत, यातील दहा सामने आत्तापर्यंत पार पडले आहेत. नजर लीग क्रिकेटमध्ये सॅन फ्रान्सिको युनिकॉन्स यांनी चांगली कामगिरी केली आहे. मेजर लीग क्रिकेट झाल्यानंतर कॅरिबियन प्रीमियर लीग सुरू होणार आहे. या स्पर्धेला सुरुवात 15 ऑगस्टपासून होणार आहे. या स्पर्धेमध्ये देखील 34 सामने खेळवले जाणार आहेत आणि सहा संघ सहभागी होणार आहेत. आता या स्पर्धेसंदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे.
ट्रिनबागो नाईट रायडर्स (TKR) ने कॅरिबियन प्रीमियर लीग (CPL) २०२५ साठी ड्वेन ब्राव्होची मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. ते फिल सिमन्सची जागा घेणार आहे. फिल सिमन्स यांनी बांगलादेश संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून भूमिका बजावली आहे. ब्राव्हो २०१३ पासून या लीगशी संबंधित आहे. त्याने ११ हंगामात १०७ सामने खेळले. या दरम्यान, त्याने ८.७४ च्या इकॉनॉमी रेटने १२९ विकेट घेतल्या. तो ९ हंगामांसाठी फ्रँचायझीसोबत राहिला, ज्या दरम्यान टीकेआरने ४ जेतेपदे जिंकली.
‘मी महिला क्रिकेटमध्ये…’,अनाया बांगरच्या पोस्टने उडवली खळबळ! वेधले ICC आणि BCCI चे लक्ष, Video Viral
ब्राव्होने सोशल मीडियावरील पोस्टमध्ये लिहिले आहे की, “माझ्या हृदयाच्या खूप जवळ असलेल्या टीकेआर संघाचे मुख्य प्रशिक्षक होण्याची संधी मिळणे हा एक सन्मान आहे. गेल्या काही वर्षांत प्रशिक्षक फिल सिमन्स यांनी दिलेल्या वेळेबद्दल आणि वचनबद्धतेबद्दल मी त्यांचे वैयक्तिकरित्या आभार मानू इच्छितो आणि आता मी माझ्यासाठी आणि माझ्या कर्मचाऱ्यांसाठी या नवीन आव्हानाची वाट पाहत आहे.”
Sir Champion is back again, but this time he will wear a new hat for TKR 🎩
Welcome, Head Coach, Dwayne Bravo 👏
“It’s an honor to be given the opportunity to be Head Coach of TKR, a team that’s very close to my heart. I would like to personally thank Coach Phil Simmons for his… pic.twitter.com/biNfvtvrho
— Trinbago Knight Riders (@TKRiders) June 20, 2025
ब्राव्होचा कोचिंग पोर्टफोलिओ सतत वाढत आहे. गेल्या वर्षी त्याला ILT20 मध्ये अबू धाबी नाईट रायडर्सचे मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्त करण्यात आले. हा नाईट रायडर्स ग्रुपच्या मालकीचा संघ आहे. त्याने आयपीएल २०२५ मध्ये कोलकाता नाईट रायडर्ससाठी मार्गदर्शक म्हणूनही काम केले. ब्राव्होने २०२२ मध्ये आयपीएलमधून निवृत्ती घेतली. त्यानंतर, त्याने २०२३ आणि २०२४ मध्ये चेन्नई सुपर किंग्जसोबत गोलंदाजी सल्लागार म्हणून काम केले.