फोटो सौजन्य - अनाया बांगर इंस्टाग्राम
अनाया बांगर पोस्ट : भारताचे माजी खेळाडू आणि माझे प्रशिक्षक संजय बांगर यांचा मुलगा आर्यन बांगर यांने त्याचे लिंग बदलले आणि त्यानंतर सातत्याने चर्चेत राहिला आहे. संजय बांगर यांची मुलगी ती आधी मुलगा होती त्यानंतर तिने तिचे लिंग बदलले आणि मुलगी झाली आणि तिने स्वतःचे नाव अनाया असे ठेवले आहे. क्रिकेटपटू संजय बांगर यांनी या संदर्भात कधीही कोणत्याही प्लॅटफॉर्मवर स्पष्टपणे बोलावले नाही पण अनाया बांगर ही नेहमी सातत्याने तिच्या संदर्भात सोशल मीडियावर त्याचबरोबर मुलाखतींमध्ये स्पष्टपणे बोलत राहिली आहे. सोशल मिडीयावर यासंदर्भात मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
संजय बांगर यांचा जो आधीचा मुलगा होता तो क्रिकेट खेळत होता तिने आता लिंग बदलल्यानंतर आता आयसीसी म्हणजेच आंतरराष्ट्रीय क्रिकेट संस्था आणि बीसीसीआय यांच्याकडे एक खास मागणी केली आहे. आता तिचा एक तिने शेअर केलेला व्हिडीओ हा व्हायरल होत आहे. अनायाने अलिकडेच आयसीसी आणि बीसीसीआयला ट्रान्सजेंडर क्रिकेटर्सना पाठिंबा देण्याची विनंती केली आहे. सध्या, ट्रान्सजेंडर क्रिकेटर्सना महिला क्रिकेटमध्ये भाग घेण्याची परवानगी नाही.
२०२३ च्या एकदिवसीय विश्वचषकानंतर झालेल्या आयसीसी बोर्डाच्या बैठकीत ही बंदी लागू करण्यात आली. या भागात, अनायाने आता ट्रान्सजेंडर खेळाडू म्हणून लिंग बदलाच्या तिच्या प्रवासाची माहिती देणारा ८ पानांचा वैज्ञानिक अहवाल शेअर केला आहे. त्याचा व्हिडिओ शेअर करताना बांगरने म्हटले आहे की ती हा व्हिडिओ आयसीसी आणि बीसीसीआयला पाठवत आहे. खरंतर, अनाया बांगरने तिच्या इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये ती ८ पानांचा वैज्ञानिक अहवाल हातात धरून आहे.
व्हिडीओमध्ये ती म्हणाली की, “प्रथमच, मी एक वैज्ञानिक अहवाल शेअर करत आहे जो एक ट्रान्सजेंडर महिला खेळाडू म्हणून माझ्या प्रवासाचे दस्तऐवजीकरण करतो. गेल्या वर्षभरात, हार्मोन थेरपी सुरू केल्यापासून मी संरचित शारीरिक मूल्यांकन केले आहे. हा अहवाल माझ्या संक्रमणाचा वास्तविक, मोजता येण्याजोगा परिणाम प्रतिबिंबित करतो – मते नाही, गृहीतके नाहीत तर डेटा.” असे स्पष्ट सांगितले आहे.
अनायाने पुढे सांगितले आहे की, “मी हे बीसीसीआय आणि आयसीसीला सादर करण्याची योजना आखत आहे. माझा एकमेव हेतू जागा निर्माण करणे, ती विभागणे नाही. तुम्ही सहमत असलात किंवा नसलात तरी, साक्ष दिल्याबद्दल धन्यवाद.”