Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Thackeray Brothers Alliance |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

U19 Women’s T20 World Cup 2025 : विजेतेपदाचे रक्षण करण्यासाठी मैदानात उतरणार भारतीय संघ, आजपासून स्पर्धेला सुरुवात

निक्की प्रसादच्या नेतृत्वाखालील संघ या संधीचा फायदा घेण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करेल. प्रमुख खेळाडूंमध्ये त्रिशा जी हीच संघामध्ये समावेश आहे, ज्यांनी गेल्या महिन्यात अंडर-१९ विश्वचषक स्पर्धेत भारताच्या विजयाचा पाया रचला.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Jan 18, 2025 | 10:25 AM
फोटो सौजन्य - ICC सोशल मीडिया

फोटो सौजन्य - ICC सोशल मीडिया

Follow Us
Close
Follow Us:

U19 महिला T20 विश्वचषक 2025 : जागतिक स्तरावर आपला दबदबा कायम ठेवण्याचा प्रयत्न करणाऱ्या भारताच्या पुढच्या पिढीच्या क्रिकेटपटूंनी शनिवारपासून सुरू होणाऱ्या आयसीसी अंडर-१९महिला टी-२० विश्वचषकात प्रवेश करताना विजेतेपद राखण्याचे लक्ष्य असणार आहे. भारताला अ गटात वेस्ट इंडिज, श्रीलंका आणि यजमान मलेशिया हे संघ आहेत. भारतीय संघ रविवारी पहिला सामना वेस्ट इंडिजविरुद्ध खेळणार आहे. भारताने २०२३ मध्ये दक्षिण आफ्रिकेत झालेल्या पहिल्या विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात इंग्लंडचा सात गडी राखून पराभव केला होता. २०२३ मध्ये शेफाली वर्माच्या नेतृत्वाखाली भारताने दक्षिण आफ्रिकेत ही स्पर्धा जिंकली होती. त्या संघात तीतास साधू, श्वेता सेहरावत, पार्श्वी चोप्रा आणि अर्चना देवी सारखे खेळाडू होते जे वरिष्ठ स्तरावर खेळत आहेत.

निक्की प्रसाद हिच्याकडे असणार कर्णधारपद

यावर्षी भारतात होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर, निक्की प्रसादच्या नेतृत्वाखालील संघ या संधीचा फायदा घेण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करेल. प्रमुख खेळाडूंमध्ये त्रिशा जी हीच संघामध्ये समावेश आहे, ज्यांनी गेल्या महिन्यात अंडर-१९ विश्वचषक स्पर्धेत भारताच्या विजयाचा पाया रचला होता. फिरकीपटू पारुनिका सिसोदिया, सोनम यादव आणि आयुषी शुक्ला यांचाही संघात समावेश आहे. शनिवारी शेवटचा उपांत्य सामना खेळणाऱ्या ऑस्ट्रेलियाचा सामना ड गटात स्कॉटलंडशी होईल, तर २०२३ च्या उपविजेत्या इंग्लंडचा सामना आयर्लंडशी होणार आहे.

रविवारी होणाऱ्या इतर लढतींमध्ये समोआचा सामना क गटात नायजेरियाशी, ड गटात बांगलादेशचा सामना नेपाळशी, ब गटात पाकिस्तानचा सामना अमेरिकेशी तर क गटात न्यूझीलंडचा सामना दक्षिण आफ्रिकेशी होणार आहे. स्पर्धेत १६ संघांची प्रत्येकी चार गटात विभागणी करण्यात आली असून प्रत्येक गटातील अव्वल तीन संघ सुपर सिक्समध्ये प्रवेश करतील. अव्वल दोन संघ उपांत्य फेरीत जातील आणि अंतिम सामना २ फेब्रुवारीला होणार आहे.

💬 💬 “We want to create this legacy of winning the ICC trophies.”#TeamIndia Captain Niki Prasad shares her thoughts ahead of the ICC #U19WorldCup. pic.twitter.com/nex9g11k4s — BCCI Women (@BCCIWomen) January 17, 2025

कुठे पाहता येणार लाईव्ह स्ट्रीमिंग?

आयसीसी अंडर-१९ महिला T२० विश्वचषक २०२५ सामन्यांचे थेट प्रक्षेपण भारतातील स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर उपलब्ध असेल. भारतीय महिला U-१९ संघाचे सामने चाहते Disney+Hotstar ॲप आणि वेबसाइटवर भारतात आयसीसी अंडर-१९ महिला T२० विश्वचषक २०२५ सामन्यांचे थेट प्रवाह पाहू शकतात.

U19 महिला T20 विश्वचषक 2025 गट

अ गट : भारत, मलेशिया, श्रीलंका, वेस्ट इंडिज
ब गट: इंग्लंड, आयर्लंड, पाकिस्तान, अमेरिका
क गट: न्यूझीलंड, नायजेरिया, सामोआ, दक्षिण आफ्रिका
ड गट: ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, नेपाळ, स्कॉटलंड

Web Title: U19 womens t20 world cup 2025 cricket india team to defend title

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 18, 2025 | 10:25 AM

Topics:  

  • cricket
  • T20 World Cup 2025

संबंधित बातम्या

क्रिकेट जगतात शोककळा…मैदानावरच हृदयविकाराचा झटका! रुग्णालयात झाले निधन
1

क्रिकेट जगतात शोककळा…मैदानावरच हृदयविकाराचा झटका! रुग्णालयात झाले निधन

विराट कोहलीला आऊट केल्यानंतर फलंदाजाने स्वत: दिले गोलंदाजाला खास गिफ्ट! सोशल मिडियावर Photo Viral
2

विराट कोहलीला आऊट केल्यानंतर फलंदाजाने स्वत: दिले गोलंदाजाला खास गिफ्ट! सोशल मिडियावर Photo Viral

WTC Points Table 2025-27 : ऑस्ट्रेलिया पहिल्यांदाच पराभूत, इंग्लंडला दिलासा! भारताची स्थिती खराब; टीम इंडिया पाकिस्तानपेक्षा मागे
3

WTC Points Table 2025-27 : ऑस्ट्रेलिया पहिल्यांदाच पराभूत, इंग्लंडला दिलासा! भारताची स्थिती खराब; टीम इंडिया पाकिस्तानपेक्षा मागे

AUS vs ENG : बॉक्सिंग डे कसोटी विजयानंतर बेन स्टोक्स आणि जो रूट झाले भावूक! सामन्यानंतर मारली मिठी
4

AUS vs ENG : बॉक्सिंग डे कसोटी विजयानंतर बेन स्टोक्स आणि जो रूट झाले भावूक! सामन्यानंतर मारली मिठी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.