Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 16 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Inter Hospital Cricket Tournament : रुग्णालयांच्या मैदानात क्रिकेटचा महासंग्राम; 16 नामांकित रुग्णालयांचे संघ एलिट आणि प्लेट गटात

Inter Hospital Cricket Tournament : मुंबईत 18 नोव्हेंबरपासून गिरनार आंतर रुग्णालयीन क्रिकेट स्पर्धेला सुरुवात होणार आहे. 16 नामांकित रुग्णालयांचे संघ एलिट आणि प्लेट गटांत विजेतेपदासाठी भिडणार आहेत. स्पर्धेला 33 वर्षांची परंपरा आहे.

  • By Rakesh Khedekar
Updated On: Nov 16, 2026 | 04:42 PM
Inter Hospital Cricket Tournament : रुग्णालयांच्या मैदानात क्रिकेटचा महासंग्राम; 16 नामांकित रुग्णालयांचे संघ एलिट आणि प्लेट गटात

Inter Hospital Cricket Tournament : रुग्णालयांच्या मैदानात क्रिकेटचा महासंग्राम; 16 नामांकित रुग्णालयांचे संघ एलिट आणि प्लेट गटात

Follow Us
Follow Us:
  • 18 नोव्हेंबरपासून स्पर्धेचा थरार
  • दोन गटात रंगणार स्पर्धा
  • 17 नोव्हेंबरला संघांना किटचं वाटप
 

Inter Hospital Cricket Tournament : मुंबई रुग्णालयांच्या विश्वात आता क्रिकेटचा धुरळा उडणार आहे. मुंबईतील रुग्णालयीन क्रिकेटपटूंसाठी प्रतिष्ठेचा ‘वर्ल्ड कप’ मानल्या जाणाऱ्या हिंदुजा-टाटा रुग्णालय आयोजित गिरनार चहा पुरस्कृत आंतर रुग्णालयीन क्रिकेट स्पर्धेचा रणसंग्राम 18 नोव्हेंबरपासून रंगणार आहे.
मुंबईतील 16 नामांकित रुग्णालयांचे संघ या स्पर्धेत विजेतेपदासाठी मैदानात उतरतील. ब्रीच कँडी आणि कोकिळाबेन अंबानी या एलिट गटातील दोन बलाढ्य संघांमधील लढतीने स्पर्धेचा श्रीगणेशा होणार आहे.

1994 पासून स्पर्धा अखंडपणे सुरू

गेली तब्बल 33 वर्षे अखंडपणे सुरू असलेल्या या स्पर्धेने मुंबईच्या क्रिकेटविश्वात स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले आहे. हिंदुजा आणि टाटा रुग्णालयातील क्रिकेटप्रेमी कर्मचाऱ्यांच्या जिद्दीतून आणि अथक परिश्रमांतून या स्पर्धेची परंपरा आजही तितक्याच उत्साहात सुरू आहे.
मिलिंद सावंत आणि डॉ. हुमायूं जाफरी यांच्या पुढाकारातून 1994 मध्ये या स्पर्धेची मुहूर्तमेढ रोवण्यात आली. खासगी आणि सरकारी रुग्णालयांतील क्रिकेटपटूंना क्रिकेटच्या माध्यमातून व्यासपीठ मिळावे आणि त्यांना कायमस्वरूपी रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश होता.
तीन दशकांनंतरही या स्पर्धेचा उत्साह ओसरलेला नाही, हेच तिचे मोठे यश आहे. या स्पर्धेचे उद्घाटन 17 नोव्हेंबरला मुंबई क्रिकेट संघटनेचे सचिव डॉ. उन्मेष खानविलकर, कोषाध्यक्ष अरमान मलिक आणि स्पर्धा सचिव विघ्नेश कदम यांच्या उपस्थितीत शिवाजी पार्कच्या बंगाल क्लबमध्ये होणार असल्याची माहिती आयोजक मिलिंद सावंत यांनी दिली. याप्रसंगी सर्व संघाना किटचे वाटप केले जाणार आहे.

मुंबईच्या गल्लीत सचिनसोबत ब्रिटनच्या विल्यम-केट खेळले क्रिकेट; कुल्हडचा चहा अन्…; Video Viral

दोन गटात रंगणार स्पर्धा

यंदाची स्पर्धाही एलिट आणि प्लेट अशा दोन गटांत रंगणार आहे. एलिट गटात मुंबईतील आठ नामांकित रुग्णालयांचे संघ विजेतेपदासाठी एकमेकांना आव्हान देतील, तर प्लेट गटातही आठ संघांमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे. एलिट गटात नानावटी, हिंदुजा, टाटा, जे. जे., केईएम, जसलोक, ब्रीच कँडी आणि कोकिळाबेन अंबानी या संघांचा समावेश आहे. तर प्लेट गटात बॉम्बे , हिरानंदानी, रहेजा, लोकमान्य टिळक, कस्तुरबा, लीलावती आणि ग्लेन ईगल्स हे रुग्णालयीन संघ आपले कौशल्य पणाला लावतील.

या स्पर्धेनं केवळ रुग्णालयीन क्रिकेटपटूंना व्यासपीठ दिले नाही, तर मुंबई क्रिकेटला नंदू पाटील, अविनाश जाधव, जीतेंद्र परदेशी, ओंकार जाधव, श्रीकांत दुधवडकर आणि प्रदीप क्षीरसागर यांच्यासारखे गुणवंत क्रिकेटपटूही दिले आहेत. त्यामुळे ही स्पर्धा केवळ रुग्णालयांमधील क्रिकेटची चुरस नसून नव्या प्रतिभेला संधी देणारे महत्त्वाचे व्यासपीठ ठरली आहे.

IND Vs NZ: ही तयारी पाहून किवी घाबरतील! न्यूझीलंडविरुद्ध भारताची अग्निपरीक्षा; WTC साठी भिडणार

स्पर्धेचे दिमाखदार आयोजन करण्यासाठी गिरनार रुग्णालय स्पर्धा समितीचे अध्यक्ष जॉय चक्रवर्ती, सचिव डॉ. हुमायू जाफरी, कोषाध्यक्ष मिलिंद सावंत आणि संयुक्त सचिव अनिल बैकर विशेष मेहनत घेत आहेत. ३३ वर्षांची समृद्ध परंपरा, १६ संघांचा सहभाग आणि प्रतिष्ठेचे विजेतेपद यामुळे यंदाच्या गिरनार स्पर्धेतही क्रिकेटचा थरार अनुभवायला मिळणार, याबाबत कुणाच्याही मनात तीळमात्र शंका नाही.

💡

Frequently Asked Questions

  • Que: गिरनार आंतर रुग्णालयीन क्रिकेट स्पर्धा कधी सुरू होणार आहे?

    Ans: गिरनार आंतर रुग्णालयीन क्रिकेट स्पर्धेला 18 नोव्हेंबर 2026 पासून सुरुवात होणार आहे.

  • Que: स्पर्धेचे आयोजन कोणत्या गटांत करण्यात आले आहे?

    Ans: स्पर्धेचे आयोजन एलिट आणि प्लेट अशा दोन गटांत करण्यात आले आहे. प्रत्येक गटात आठ संघ असतील.

  • Que: एलिट गटात कोणत्या रुग्णालयांच्या संघांचा समावेश आहे?

    Ans: नानावटी, हिंदुजा, टाटा, जे. जे., केईएम, जसलोक, ब्रीच कँडी आणि कोकिळाबेन अंबानी या संघांचा एलिट गटात समावेश आहे.

Web Title: Girnar inter hospital cricket tournament mumbai 2026 rk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 16, 2026 | 04:42 PM

Topics:  

  • cricket
  • Hospital
  • MCA

संबंधित बातम्या

Womens County Cricket : ठाण्याच्या धनश्रीची इंग्लंडमध्ये भरारी! महिला काउंटी क्रिकेटसाठी झाली निवड
1

Womens County Cricket : ठाण्याच्या धनश्रीची इंग्लंडमध्ये भरारी! महिला काउंटी क्रिकेटसाठी झाली निवड

Dilip Vengsarkar : क्रिकेटमध्ये कौशल्यासोबत मेहनत, शिस्तही महत्त्वाची; दिलीप वेंगसरकर यांचा युवा खेळाडूंना कानमंत्र
2

Dilip Vengsarkar : क्रिकेटमध्ये कौशल्यासोबत मेहनत, शिस्तही महत्त्वाची; दिलीप वेंगसरकर यांचा युवा खेळाडूंना कानमंत्र

Sachin Tendulkar : सचिनच्या बॅट्स सांगणार क्रिकेटमधील सुवर्णकथा; मुंबईत ‘बॅटोग्राफी’ चा अनोखा संगम
3

Sachin Tendulkar : सचिनच्या बॅट्स सांगणार क्रिकेटमधील सुवर्णकथा; मुंबईत ‘बॅटोग्राफी’ चा अनोखा संगम

Syed Mushtaq Ali Trophy : महाराष्ट्राचा संघ जाहीर; गायकवाड-पृथ्वी शॉवर असणार अनेकांच्या नजरा
4

Syed Mushtaq Ali Trophy : महाराष्ट्राचा संघ जाहीर; गायकवाड-पृथ्वी शॉवर असणार अनेकांच्या नजरा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.