OMAN vs UAE 2025: 'यूएई'ने उभा केला धावांचा डोंगर; ओमानला दिले तब्बल 'इतक्या' धावांचे लक्ष्य
Asia Cup 2025: आशिया कप २०२५ मध्ये आतापर्यंत सहा सामने खेळवण्यात आले आहेत. आज संयुक्त अरब अमिराती आणि ओमान यांच्यात सातवा सामना सुरू आहे. ओमानने टॉस जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला व संयुक्त अरब अमिरातीच्या संघाला फलंदाजी करण्यासाठी आमंत्रित केले होते. दरम्यान संयुक्त अरब अमिरातीच्या संघाने 20 ओव्हर्स खेळत 172 धावा केल्या आहेत. दरम्यान संयुक्त अरब अमिरातीने ओमानला 173 धावांचे लक्ष्य दिले आहे.
यजमान यूएईने नोंदवला पहिला विजय
आशिया कप २०२५ मधील सातवा सामना संयुक्त अरब अमिराती आणि ओमान यांच्यात अबू धाबी येथील शेख झायेद स्टेडियमवर खेळवण्यात आला.या सामन्यात यूएईने कर्णधार मुहम्मद वसीम आणि अलिशान शराफू यांच्या अर्धशतकाच्या जोरावर २० ओवरमध्ये ५ गडी गमावून १७२ धावा केल्या होत्या. धावांचा पाठलाग करणारा ओमान संघ १८.४ ओव्हरमध्ये सर्वबाद १३० धावाच करू शकला. परिणामी यूएई संघाने शानदार विजय मिळवला. ओमानकडून आर्यन बिष्टने सर्वाधिक २४ धावा केल्या तर यूईकडून जुनैद सिद्दीकीने सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या. आशिया कप स्पर्धेत यूएई संघाचा हा आपला पहिला विजय मिळवला आहे.
तत्पूर्वी, सामन्यापूर्वी ओमान संघाचा कर्णधार जतिंदर सिंगने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय यूएईच्या सलामीवीरांनी चुकीचा ठरवला. मुहम्मद वसीम आणि अलिशान शराफू या जोडीने ८८ धावांची भागीदारी करून संघाला चांगली सुरवात करून दिली. त्यानंतर अलिशान शराफू ५१ धावांवर माघारी परतला तर कर्णधार टिकून खेळत राहिला. वसिम ६९ धावा कडून बाद झाला. त्याने या खेळीत ६ चौकार आणि ३ षटकार मारले. दोन सलामीवीर वगळता इतर फलंदाजांना धावा जमवण्यात यश आले नाही.
UAE vs OMAN : यजमान यूएईने नोंदवला पहिला विजय; ओमानचा 42 धावांनी केला पराभव
यूएईने दिलेल्या १७३ धावांचा लक्ष्याचा पाठलाग करण्यास उतरलेल्या ओमान संघाची सुरवात चांगली झाली नाही. ओमानकडून जतिंदर सिंग२०, आमिर कलीम २, हम्माद मिर्झा ५ , वसीम अली १, आर्यन बिष्ट २४, विनायक शुक्ला २०, जितेन रामानंदी १३, हसनैन शाह ०, शकील अहमद आणि समय श्रीवास्तव धावांवर नाबाद राहिले. यूएईकडून जुनैद सिद्दीकीने सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या.
दोन्ही संघांचे प्लेइंग इलेव्हन खालील प्रमाणे
ओमान प्लेइंग इलेव्हन: जतिंदर सिंग (कर्णधार), आमिर कलीम, हम्माद मिर्झा, विनायक शुक्ला (यष्टीरक्षक), आर्यन बिष्ट, शाह फैसल, हसनैन शाह, वसीम अली, जितेन रामानंदी, शकील अहमद, समय श्रीवास्तव.
UAE प्लेइंग इलेव्हन: मुहम्मद वसीम (सी), अलिशान शराफू, मुहम्मद जोहैब, राहु