Rahul Dravid's amazing coaching career
Rahul Dravid Got an Offer from KKR : ICC T20 विश्वचषक 2024 संपल्यानंतर टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांचा कार्यकाळही संपला. राहुल द्रविडला याबाबत विचारले असता त्याने गंमतीने सांगितले की, आता मी बेरोजगार झालो आहे, काही ऑफर असेल तर सांगा. असे द्रविडने माध्यमांशी बोलताना सांगितले होते. आता या दिग्गज क्रिकेटर्स राहुल द्रविडला मोठी ऑफर आल्याचे वृत्त आहे. ही ऑफर त्यांना IPL फ्रॅंचायझी संघाने दिली आहे. या वेळेचा चॅम्पियन असलेल्या KKR आता एका चांगल्या कोचच्या शोधात आहे.
KKR संघाच्या फ्रॅंचायझीने द्रविडशी साधला संपर्क
एका प्रसिद्ध वृत्तवाहिनीच्या बातमीनुसार, कोलकाता नाईट रायडर्स (KKR) संघाने राहुल द्रविडशी संपर्क साधला आहे. राहुल द्रविडने इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2025 मध्ये मार्गदर्शक म्हणून संघात सामील व्हावे अशी त्यांची इच्छा आहे. द्रविडच्या कार्यकाळात टीम इंडियाने टी-20 वर्ल्ड कप 2024, आशिया कप, वर्ल्ड कप 2023 जिंकले आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची अंतिम फेरी गाठली. वास्तविक, गौतम गंभीर 2024 मध्ये केकेआरचा मार्गदर्शक म्हणून संघात सामील झाला होता, परंतु त्याने संघ सोडल्याचे बोलले जात आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) टीम इंडियाच्या नवीन मुख्य प्रशिक्षकपदासाठी जागा जाहीर केल्यापासून गंभीर ही भूमिका घेऊ शकतो अशा बातम्या येत होत्या.
IPL 2024 ची चॅम्पियन ठरली होती KKR
२०२४ मध्ये गंभीर केकेआरचा मार्गदर्शक होता आणि केकेआरने जेतेपदावर कब्जा केला. यानंतर बीसीसीआय मुख्य प्रशिक्षकपदाबाबत गंभीरशी सतत बोलत होते. नुकताच गंभीर कोलकाताहून परतला, त्याला कोलकात्यात निरोप देण्यात आला आणि लवकरच बीसीसीआय घोषणा करेल की गौतम गंभीर टीम इंडियाचा पुढील मुख्य प्रशिक्षक असेल.
T20 विश्वचषक 2024 चे विजेतेपद पटकावल्यानंतर टीम इंडिया झिम्बाब्वे दौऱ्यावर 5 सामन्यांची T20 आंतरराष्ट्रीय मालिका खेळत आहे आणि त्यानंतर टीम इंडियाला पुढील महिन्यात श्रीलंका दौऱ्यावर जायचे आहे. व्हीव्हीएस लक्ष्मण हे झिम्बाब्वे दौऱ्यावर मुख्य प्रशिक्षक म्हणून गेले असून, श्रीलंकेविरुद्धच्या दौऱ्यापूर्वी गौतम गंभीर त्याच्या प्रशिक्षकपदाची धुरा सांभाळणार असल्याचे वृत्त आहे.