फोटो सौजन्य - सोशल मिडिया
UP T20 लीग 2025 आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. स्पर्धेत 4 प्लेऑफ संघांचीही पुष्टी झाली आहे. ज्यामध्ये रिंकू सिंगचे मेरठ मॅव्हेरिक्स, काशी रुद्रस, लखनऊ फाल्कन्स आणि गौर गोरखपूर लायन्स संघांचा समावेश आहे. या स्पर्धेत 6 संघांनी भाग घेतला होता, त्यापैकी नोएडा किंग्ज आणि कानपूर सुपरस्टार्सने आता निरोप घेतला आहे. आता UP T20 लीगचा क्वालिफायर-1 सामना 3 सप्टेंबर रोजी काशी रुद्रस आणि मेरठ मॅव्हेरिक्स यांच्यात खेळला जाईल. हा सामना जिंकणारा संघ थेट अंतिम फेरीत पोहोचेल, तर पराभूत संघ क्वालिफायर-2 मध्ये एलिमिनेटर जिंकणाऱ्या संघाशी सामना करेल.
एलिमिनेटरमध्ये लखनौ फाल्कन्सचा सामना गौर गोरखपूर लायन्सशी होईल. या सामन्यात जो संघ हरेल तो या स्पर्धेतून बाहेर पडेल. हा सामना देखील ३ सप्टेंबर रोजी खेळला जाईल. त्यानंतर ४ सप्टेंबर रोजी क्वालिफायर-२ खेळला जाईल आणि यूपी टी२० लीग २०२५ चा अंतिम सामना ६ सप्टेंबर रोजी खेळला जाईल.
📍 BRSABV Ekana Stadium, Lucknow — 𝘾𝙡𝙚𝙖𝙧 𝙮𝙤𝙪𝙧 𝙘𝙖𝙡𝙚𝙣𝙙𝙖𝙧𝙨. 𝙇𝙤𝙘𝙠 𝙞𝙣 𝙩𝙝𝙚 𝙙𝙖𝙩𝙚𝙨.
(1/2) pic.twitter.com/scxwZVQeED— UP T20 League (@t20uttarpradesh) July 17, 2025
उत्तर प्रदेश t20 लीग आता शेवटचे टप्प्यात आहे. या दमदार लीगमध्ये 32 साखळी सामने पार पडले यामध्ये आत्ता चार प्ले ऑफसाठी संघ पक्के झाले आहेत. युपी t20 च्या गुणतालिकेमध्ये पहिल्या स्थानावर काशी रुद्रास या संघाने दहा सामने खेळले आहेत या दहा सामन्यांमध्ये त्यांनी सात सामन्यात विजय मिळवला आहे तर तीन सामना त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. दुसरा स्थानावर मेरठ मावेरीक्स हा संघ आहे या संघाने आतापर्यंत 10 सामन्यांपैकी सहा सामन्यात विजय मिळवला आहे तर चार सामन्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता.
प्ले ऑफच्या शर्यतीत स्थान पक्के करणारा तिसरा संघ आहे तो म्हणजेच लखनऊ फाल्कोंसचा संघ आहे. लखनऊ फाल्कोषा संघाने 10 सामन्यांपैकी पाच सामन्यात विजय मिळवला आहे, तर पाच सामन्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. प्ले ऑफ च्या शर्यतीमध्ये स्थान पक्के करणारा चौथा संघ आहे तो म्हणजेच गोरखपुर लायन्स. गोरखपूर लायन्स संघाने आतापर्यंत दहा सामने खेळले आहे त्यामध्ये पाच सामन्यात त्यांना विजय मिळाला आहे तर पाच सामन्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे.