
UP vs GT, WPL Live Update: Gujarat Giants set a massive target of 207 runs against UP! Captain Ashleigh Gardner scored a blistering half-century.
Gujarat Giants set a target of 208 runs against UP : महिला प्रीमियर लीग २०२६ चा हंगाम सुरू झाला असून या हंगामातील दूसरा सामना आज शनिवारी यूपी वॉरियर्स आणि गुजरात जायंट्स यांच्यात मुंबईतील डॉ. डीवाय पाटील स्टेडियमवर खेळला जात आहे. या सामन्यात नाणेफेक गमावणाऱ्या गुजारत जायंट्सच्या संघाने प्रथम फलंदाजी करत कर्णधार ऍशलेह गार्डनरच्या शानदार अर्धशतकाच्या जोरावर ४ बाद २०७ धावांचा डोंगर उभा केला आहे. आता यूपी वॉरियर्सला विजयासाठी २०८ धावा कराव्या लागणार आहे. यूपी वॉरियर्सकडून सोफी एक्लेस्टोनने २ विकेट्स घेतल्या
हेही वाचा : कुंडलीतच क्रिकेट कारकिर्द लिहिलेली! भारतीय खेळाडू वैष्णवीच्या वडिलांनी केली होती भविष्यवाणी; वाचा सविस्तर
सामान्यापूर्वी यूपी वॉरियर्सची कर्णधार मेग लॅनिंगने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. तर गुजारत जायंट्स प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित करण्यात आले. सोफी डिव्हाईन आणि बेथ मुनी यांनी गुजरात जायंट्सच्या डावाची सुरुवात केली आणि पहिल्या विकेट्ससाठी ४१ धावांची खेळी केली. त्यानंतर सोफी डिव्हाईन १३ धावा करून सोफी एक्लेस्टोनची शिकार ठरली. डिव्हाईननंतर अनुष्का शर्मा मैदानात आली. त्यानंतर लवकरच सोफी डिव्हाईन २० चेंडूत ३८ धावा करून बाद झाली. यंदये तिने ५ चौकार आणि २ षटकार लगावले. तिला शिखा पांडेने बाद केले. त्यानंतर कर्णधार ऍशलेह गार्डनर मैदानात आली आणि तिने अनुष्का शर्मासोबत घेऊन यूपीच्या गोलंदाजांवर चांगलाच हल्ला चढवला. या दोघी खूप आक्रमक दिसून आल्या.
ऍशलेह गार्डनर आणि अनुष्का शर्मा यांनी १०३ धावांची शतकी भागीदारी केली. यानंतर शर्मा बाद झाली. अनुष्काने ३० चेंडूत ४४ धावांची खेळी केली. यामध्ये तिने ७ चौकार लगावले. शर्माला डिआन्ड्रा डॉटिनने माघारी पाठवले. दरम्यान कर्णधार ऍशलेह गार्डनरने आपले अर्धशतक पूर्ण केले. त्यानंतर ती बाद झाली. गार्डनरने ४१ चेंडूत ६५ धावा केल्या. या दरम्यान तिने ६ चौकार आणि ३ षटकार लगावले. तिला सोफी एक्लेस्टोनने बाद केले. त्यानंतर मैदानात जॉर्जिया वेरहॅमने आक्रमक खेळी करून नाबाद २७ धावा केल्या, तसेच भारती फुलमाळीने देखील ७ चेंडूत नाबाद १४ धावा केल्या आणि यूपी वॉरियर्ससमोर २०७ धावांचे लक्ष्य ठेवले. यूपी वॉरियर्सकडून सोफी एक्लेस्टोनने सर्वाधिक २ विकेट्स तर डिआन्ड्रा डॉटिन आणि शिखा पांडे यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.
यूपी वॉरियर्स : डिआन्ड्रा डॉटिन, मेग लॅनिंग (कर्णधार), फोबी लिचफिल्ड, हरलीन देओल, दीप्ती शर्मा, किरण नवगिरे, श्वेता सेहरावत (विकेटकीपर), आशा शोभना, सोफी एक्लेस्टोन, शिखा पांडे, क्रांती गौड
गुजरात जायंट्स : सोफी डिव्हाईन, बेथ मुनी (यष्टीरक्षक),ऍशलेह गार्डनर (कर्णधार), अनुष्का शर्मा, कनिका आहुजा, भारती फुलमाळी,काशवी गौतम, तनुजा कंवर, राजेश्वरी गायकवाड, जॉर्जिया वेरहॅम, रेणुका सिंह ठाकूर