US Open 2025: 'I still want a Grand Slam..' Novak Djokovic reacts to retirement rumors after semifinal defeat
Novak Djokovic’s reaction after US Open 2025 semifinal defeat : नोवाक जोकोविचला यूएस ओपन २०२५ च्या अंतिम फेरीत पोहचता आले नाही. या स्पर्धेच्या सेमीफायनल सामन्यात त्याला स्टार खेळाडू कार्लोस अल्काराझकडून पराभव पत्करावा लागला. त्यानंतर या सर्बियन खेळाडूच्या निवृत्तीच्या बातम्या जोर धरू लागल्या. आता मात्र त्याने या सर्व गोष्टींवर आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्याने म्हटले आहे की या सर्व अफवा आहेत. यामध्ये काही एक तथ्य नाही. जोकोविचने त्याच्या निवेदनात म्हटले आहे की तो पुढील वर्षी संपूर्ण ग्रँड स्लॅम हंगाम खेळण्याची इच्छा बाळगून आहे.
यूएस ओपन २०२५ च्या सेमीफायनल सामन्यामध्ये २२ वर्षीय तरुण स्पॅनिश खेळाडू कार्लोस अल्काराझने ३८ वर्षीय दिग्गज सर्बियन खेळाडू नोवाक जोकोविचचा ६-४, ७-६ (४), ६-२ असा दणदणीत पराभव केला. यानंतर त्याने न्यू यॉर्कमध्ये त्याच्या सातव्या मोठ्या फायनलमध्ये प्रवेश निश्चित केला. हा सामना आर्थर अॅश स्टेडियमवर खेळला गेला. जो सुमारे २ तास २५ मिनिटे सुरू होता. या विजयासह कार्लोसने जोकोविचचा बदला घेतला आहे. या वर्षीच्या ऑस्ट्रेलियन ओपन आणि २०२४ च्या मेजर फायनलमध्ये त्याला जोकोविचकडून पराभूत व्हावे लागले होते.
हेही वाचा : US Open 2025 Final होणार ऐतिहासिक, हे 2 स्टार सलग तिसऱ्यांदा जेतेपदासाठी लढणार! डोनाल्ड ट्रम्पही दिसणार
यूएस ओपनच्या सेमीफायनल सामन्यामध्ये पराभव झाल्यानंतर, सर्बियन खेळाडू नोवाक जोकोविचचे आपली प्रतिक्रिया दिली, तो म्हणाला, “मला अजून देखील ग्रँड स्लॅम खेळायचे आहे. मला पुढच्या वर्षी संपूर्ण ग्रँड स्लॅम हंगाम खेळून काढयचा आहे. ते घडते की नाही ते बघावे लागेल. पण स्लॅम हे स्लॅम असतात. हे इतर कोणत्याही स्पर्धेपेक्षा खूप वेगळे असतात. हे आपल्या खेळाचे आधारस्तंभ असून आपल्या सर्वात महत्वाच्या स्पर्धा आहेत.”
जोकोविच पुढे म्हणाला की, “मी माझ्या टेनिसच्या दर्जाबद्दल आनंदी आहे, परंतु हा शारीरिक क्षमतेचा विषय आहे. मी क्वार्टर फायनलनंतर पत्रकार परिषदेत बोलल्याप्रमाणे, मी माझ्या शरीराला ही पातळी आणि लय राखण्यासाठी काही तास तयार करण्याचा प्रयत्न केला, परंतु ते पुरेसे नव्हते. माझ्या कारकिर्दीच्या या टप्प्यावर, हे असे काहीतरी आहे ज्यावर माझे काही एक नियंत्रण नाही.” १०० टूर-लेव्हल जेतेपदे आपल्या नावे करणारा दिग्गज टेनिसपटू नोवाक जोकोविचने असा विश्वास व्यक्त केला आहे की, जर तो शारीरिकदृष्ट्या त्याची पातळी राखू शकत नसेल तर ते निराशाजनक असे आहे. सर्बियन खेळाडूने हे देखील मान्य केले आहे की, या वयात हे अपरिहार्य असे आहे.
हेही वाचा : ‘मी त्यांना पसंत नव्हतो…’, निवृत्ती घेताच अमित मिश्राचा ‘या’ दोन भारतीय माजी कर्णधारांवर केला हल्लाबोल..
जोकोविच पुढे म्हणाला की, “हे वेळ आणि वयानुसार येत असते. मला अजून देखील स्पर्धेचा थरार जाणवत आहे. या सामन्यात मला प्रेक्षकांकडून खूप चांगला पाठिंबा मिळाला आहे. मी याबद्दल खूप आभारी असून मला खेळ खूप आवडला आहे. मी खेळत राहण्याचे हे एक मोठे कारण देखील आहे. गेल्या काही वर्षांत मला जगभरातून मिळालेले प्रेम आश्चर्यकारक असेच आहे.”