अमित मिश्रा(फोटो-सोशल मीडिया)
Amit Mishra’s sensational statement : भारतीय संघाचा माजी फिरकी गोलंदाज आणि आयपीएलमधील यशस्वी गोलंदाज अमित मिश्राने नुकतीच म्हणजे ४ सप्टेंबर २०२५ रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. तो तब्बल २५ वर्षे टीम इंडियासाठी खेळला असून या कालावधीत त्याने त्याच्या क्रिकेट कारकिर्दीत अनेक छोट्या मोठ्या कामगिरी केल्या आहेत.
हेही वाचा : PHOTO: भारताचा संघ आशिया कपसाठी सज्ज! कोणाला मिळणार Playing 11 मध्ये जागा?
अमित मिश्रा बद्दल एक वास्तव सांगायचे झाले तर तो टीम इंडियासाठी सातत्याने खेळू शकला नाही. २५ वर्षांच्या त्याच्या कारकिर्दीत तो बहुतेक वेळा टीम इंडियाचा भाग राहिलेला नाही. तो महेंद्रसिंग धोनी आणि विराट कोहली सारख्या दिग्गज खेळाडूंच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाकडून खूप वेळा खेळला आहे. आता अशातच त्याने टीम इंडियाबाबत एक मोठा खळबळजनक खुलासा केला आहे. अमित मिश्राकडून भारतीय संघातील राजकारणाबाबत मोठे खुलासे करण्यात आले आहेत.
अमित मिश्रा माजी कर्णधारांवर निशाणा
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केल्यावर अमित मिश्राने एक मुलाखत दिली. यामध्ये त्याने भारतीय संघातील राजकारणातील अनेक मुद्द्यावर भाष्य करत सर्वांचे लक्ष वेधले आहे. या मुलाखतीत त्याने काही महत्त्वाच्या आणि आश्चर्यकारक गोष्टींना तोंड फोडले. त्याने म्हटले आहे की काही कर्णधारांचे भारतीय संघात आवडते खेळाडू आहेत. या यादीमध्ये त्याचे स्थान नव्हते. माजी फिरकी गोलंदाज म्हणाला की या गोष्टी अजिबात महत्त्वाच्या ठरत नाहीत. मिश्राने मुळाखातीत म्हटले की, जेव्हा दुसरा खेळाडू चांगली कामगिरी करत असे तेव्हा त्याला संधी मिळत असे, पण जेव्हा तो चांगली कामगिरी करायचा तेव्हा मात्र त्याच्याकडे दुर्लक्ष केले जायचे.
अमित मिश्रा पुढे म्हणाला की म्हणाला की, “काही खेळाडू नेहमीच कर्णधाराचे आवडते राहत असतात, पण हे फार काही महत्त्वाचे नसते. संधी मिळाल्यावर तुम्हाला केवळ स्वतःला सिद्ध करावे लागणार असते. मी तुम्हाला आत्ताच सांगितल्याप्रमाणे, या गोष्टी महत्त्वाच्या नसुन जर एखादा खेळाडू तुमच्यापेक्षा चांगली कामगिरी करताना दिसत असेल तर त्याला जास्त पसंती देण्यात येते. तथापि, जेव्हा तुम्ही चांगले खेळायला सुरुवात करता तेव्हा गोष्टी बदलत जातात.”
हेही वाचा : US Open 2025 Final होणार ऐतिहासिक, हे 2 स्टार सलग तिसऱ्यांदा जेतेपदासाठी लढणार! डोनाल्ड ट्रम्पही दिसणार
अमित मिश्राचे विधान महेंद्रसिंग धोनी आणि विराट कोहलीसोबत जोडले जाऊ लागले आहे. अमित मिश्रा हा त्याच्या क्रिकेट कारकिर्दीचा बराचसा काळ त्या दोघांच्या नेतृत्वाखाली खेळला आहे. मिश्राने धोनी आणि कोहलीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियासाठी बऱ्याच सामन्यात खेळला असून अशा परिस्थितीत, त्याचे संकेत कोहली-धोनीकडे असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.