Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 11 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

US Open 2026: सबालेन्काचा पेगुलाला धक्का, रायबाकिनाने गॉफला रडवलं; आता ट्रॉफीसाठी महामुकाबला

Sabalenka Rybakina Reached Final Of US open 2026: यूएस ओपन २०२६ च्या महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात आर्यना सबालेन्का आणि एलेना रायबाकिना आमनेसामने असतील. अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी सबालेन्काने जेसिका पेगुलाला, तर रायबाकिनाने कोको गॉफला पराभूत केले.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Sep 11, 2026 | 04:45 PM
Sabalenka Rybakina Reached Final

Sabalenka Rybakina Reached Final

Follow Us
Follow Us:
  • सबालेन्काचा पेगुलावर विजय
  • रायबाकिना गॉफला दिला धक्का
  • आता जेतेपदासाठी थेट लढत

यूएस ओपन २०२६ (US Open 2026) च्या स्पर्धेचे महिला एकेरीच्या अंतिम सामन्याचे चित्र आता अधिक स्पष्ट झाले आहे. अव्वल मानांकित आर्यना सबालेन्का आणि कझाकस्तानची एलेना रायबाकिना विजेतेपदासाठी आमनेसामने येतील. अमेरिकेच्या कोको गॉफ आणि जेसिका पेगुला यांचा प्रवास उपांत्य फेरीतच संपला आहे.

IND vs BAN: Shree Charani च्या फिरकीचा कहर! फलंदाजांची उडवली दाणादाण, खास क्लबमध्ये मिळवलं मानाचं स्थान

सबालेन्काने पेगुलाला सरळ सेट्समध्ये केले पराभूत

आर्थर ॲश स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या पहिल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात, सबालेन्काने तिसऱ्या मानांकित जेसिका पेगुलाचा ७-५, ६-२ असा पराभव केला. या विजयामुळे, ती सलग तिसऱ्या यूएस ओपन विजेतेपदापासून फक्त एक विजय दूर आहे. सबालेन्काने संपूर्ण सामन्यात आपल्या सर्व्हिस आणि शक्तिशाली ग्राऊंडस्ट्रोक्सचा उत्कृष्टपणे वापर केला. तिने पेगुलाला कमबॅक करण्याची कोणतीही संधी दिली नाही.

पहिला सेट दोन्ही खेळाडूंमध्ये अटीतटीचा झाला. १२व्या गेमपर्यंत दोघींनीही आपली सर्व्हिस राखली होती. त्यावेळी सबालेन्का ६-५ ने आघाडीवर होती. त्यानंतर तिने आक्रमक खेळ करत पेगुलावर दबाव टाकला आणि तो सेट जिंकला. दुसऱ्या सेटमध्येही सबालेन्काने सुरुवातीपासूनच दबाव कायम ठेवला. तिने पेगुलाच्या दुसऱ्या सर्व्हिसवर हल्ला चढवला आणि एका शानदार फोरहँडने सर्व्हिस ब्रेक मिळवून ३-१ अशी आघाडी घेतली. आठव्या गेममध्ये, पेगुलाचा रिटर्न लांब गेल्याने सबालेन्काला मॅच पॉइंट मिळाला. या सामन्यात सबालेन्काने सात एस आणि २९ विनर्स मारले, जी या स्पर्धेतील तिच्या सर्वोत्तम कामगिरींपैकी एक होती.

रायबाकिनाने गॉफला हरवून अंतिम फेरीत मारली धडक

दुसऱ्या उपांत्य फेरीत अमेरिकन कोको गॉफचा सामना एलेना रायबाकिनाशी झाला. गॉफने पहिला सेट ६-३ ने जिंकून सामन्याची शानदार सुरुवात केली. परंतु, त्यानंतर रायबाकिनाने जोरदार पुनरागमन करत दुसरा सेट ६-४ ने जिंकून सामना निर्णायक सेटमध्ये नेला. रायबाकिनाने तिसरा सेटही ६-४ ने जिंकून गॉफला ३-६, ६-४, ६-४ ने पराभूत केले आणि अंतिम फेरीत प्रवेश केला.या स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचण्याची रायबाकिनाची ही पहिलीच वेळ आहे. तिने आतापर्यंत दोन ग्रँड स्लॅम विजेतेपदे पटकावली आहेत. २०२२ मध्ये रायबाकिनाने विम्बल्डन आणि २०२६ च्या सुरुवातीला ऑस्ट्रेलियन ओपन जिंकली.

सबालेंका विरुद्ध रायबाकिना

यूएस ओपन २०२६ महिला एकेरीचा अंतिम सामना आता सबालेन्का आणि रायबाकिना यांच्यात खेळला जाईल. सबालेन्का तिच्या सलग तिसऱ्या विजेतेपदासाठी मैदानात उतरतील, तर रायबाकिना ट्रॉफीवर आपले नाव कोरण्याचे प्रयत्न करेल.

IND vs BAN: भारताची विजयी घोडदौड कायम; टीम इंडियाचा बांग्लादेशवर दणदणीत विजय; 10व्यांदा आशिया कपच्या फायनलमध्ये दिमाखात एन्ट्री

Web Title: Us open 2026 aryna sabalenka vs elena rybakina womens final

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 11, 2026 | 04:45 PM

Topics:  

  • Aryna Sabalenka
  • International Tennis Tournament
  • USA

संबंधित बातम्या

US Open 2026: मोठा उलटफेर! क्वार्टर फायनलमध्ये Carlos Alcaraz चा धक्कादायक पराभव; Ben Shelton ने दाखवला घरचा रस्ता
1

US Open 2026: मोठा उलटफेर! क्वार्टर फायनलमध्ये Carlos Alcaraz चा धक्कादायक पराभव; Ben Shelton ने दाखवला घरचा रस्ता

US Open 2026 मध्ये हायव्होल्टेज ड्रामा! कोर्टवर गांजाचा वास; सबालेन्काचा पारा चढला! चक्क सामना थांबवला अन्…, VIDEO व्हायरल
2

US Open 2026 मध्ये हायव्होल्टेज ड्रामा! कोर्टवर गांजाचा वास; सबालेन्काचा पारा चढला! चक्क सामना थांबवला अन्…, VIDEO व्हायरल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.