Shree Charani completed 50 in T20I wickets
श्री चरणी टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये ५० विकेट्स घेणारी दुसरी सर्वात तरुण भारतीय खेळाडू ठरली, आणि हा पराक्रम करणारी ती जगातील चौथी खेळाडू आहे. वयाच्या २० वर्षे आणि ३०० दिवसांत ५० विकेट्स घेण्याचा विक्रम सोफी एक्लेस्टोनच्या नावावर आहे. वयाच्या २० वर्षे आणि ३३४ दिवसांत हा पराक्रम करणारी भारताची राधा यादव दुसऱ्या क्रमांकावर आहे. वयाच्या २१ वर्षे आणि ३५४ दिवसांत हा पराक्रम करणारी न्यूझीलंडची अमेलिया केर या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. या यादीत चौथ्या क्रमांकावर श्री चरणीने आफले स्थान निश्चित केले आहे. तिने २२ वर्षे आणि ३७ दिवसांत हा विक्रम केले आहे. पाचव्या क्रमांकावर वेस्ट इंडिजची स्टेफनी टेलर आहे, जिने वयाच्या २२ वर्षे आणि १३५ दिवसांत हा पराक्रम केला.






