
Ball tampering Case in 2018
उस्मान ख्वाजाच्या आगामी पुस्तकातील काही अंश एका ऑस्ट्रेलियन वृत्तपत्रात प्रकाशित झाल्याचे समोर आले आहे. यामध्ये त्याने 2018 मधील दक्षिण आफ्रिका दौऱ्यातील काही घटनांवर भाष्य केले आहे. त्याच्या पुस्तकानुसार व वृत्तपत्रात समोर आलेल्या माहितीनुसार, दक्षिण आफ्रिका दौऱ्यादरम्यान संघात रिव्हर्स स्विंग मिळवण्यासाठी बॉलशी छेडछाड कशी करावी आणि कोणत्या पद्धती वापराव्या, यावर खेळाडूंमध्ये उघडपणे संभाषण होत असे.
या गैरप्रकाराबाबत आणि बॉल टेंपरींगबाबत केवळ मैदानावरील खेळाडूंनाच नाही, तर सपोर्ट स्टाफलाही पूर्ण माहिती होती, असा थेट दावा ख्वाजाने आपल्या पुस्तकात केला असल्याचे समजते आहे. 2028 मध्ये ऑस्ट्रेलिया संघ साऊथ आफ्रिकेविरुद्ध टेस्ट सिरीज खेळत होता. तेव्हा सामना सुरू असताना ऑस्ट्रेलियन खेळाडूंना सॅंडपेपरच्या मदतीने बॉल शी छेडछाड करताना पकडण्यात आले होते. या प्रकरणामुळे ऑस्ट्रेलियन क्रिकेटची जगात मोठी नाचक्की झाली होती. जी कधीही भरून न निघणारी होती. घटनेनंतर क्रिकेट ऑस्ट्रेलियाने याची चौकशी केली. यामध्ये बॉलशी छेडछाड करण्याबाबत केवळ तीनच खेळाडूंना माहिती असल्याचे समोर आले. या तीन खेळाडूंमध्ये तत्कालीन कर्णधार स्टीव्ह स्मिथ, उपकर्णधार डेव्हिड वॉर्नर आणि कॅमरन बैनक्रॉफ्ट यांचा समावेश होता.
उस्मान ख्वाजाच्या पुस्तकातील दाव्यांवर क्रिकेट ऑस्ट्रेलियाने एक अधिकृत निवेदन दिले आहे. आतापर्यंत क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या समोर सादर करण्यात आली सर्व माहितीवर अत्यंत योग्य आणि व्यवस्थितपणे विचार करण्यात आला आहे. आम्ही निष्कर्षांवर पूर्णपणे समाधानी आहोत, असे क्रिकेट ऑस्ट्रेलियाने म्हटले आहे.
उस्मान ख्वाजा का घेतोय निवृती? माजी खेळाडूवर साधला निशाणा… ऑस्ट्रेलियन प्लेयरच्या विधानाने खळबळ
ऑस्ट्रेलियाचा अनुभवी सलामीवीर उस्मान ख्वाजाने नुकतीच इंटरनॅशनल क्रिकेटमधून आपली निवृत्ती जाहीर केली आहे. वर्षाच्या सुरुवातीलाच त्याने हा निर्णय घेतला होता. त्याने ऑस्ट्रेलियासाठी ८८ कसोटी सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने 6,229 रन्स केल्या आहेत. यामध्ये त्याने 16 शतके आणि 28 अर्धशतके लगावली आहे. कसोटीशिवाय त्याने ऑस्ट्रेलियाकडून ४० वनडे सामने अन 9 टी 20 इंटरनॅशनल सामने देखील खेळले आहेत. २०१८ मधील बहुचर्चित ‘बॉल टेंपरींग’ प्रकरणावर भाष्य स्मान ख्वाजाच्या दाव्याने क्रिकेटविश्वात एकच खळबळ उडाली आहे.
Ans: बॉल टेंपरींगची घटना 2018 मध्ये साऊथ आफ्रिकेविरुद्ध घडली होती.
Ans: उस्मान ख्वाजाने बॉल टेंपरींगची माहिती सर्व खेळाडू आणि सपोर्ट स्टाफला असल्याचा गौप्यस्फोट केला आहे.