
Vaibhav Suryavanshi's attack and RR's camera crew survived! Finally apologized..; Watch the video
मागील महिन्यात वैभव सूर्यवंशीने इंग्लंडविरुद्ध खेळल्या पाच युवा एकदिवसीय सामन्यांमध्ये शानदार कामगिरी करत एकूण ३५५ धावा फटकावल्या. या दरम्यान त्याने एक शतक (१४३) आणि एक अर्धशतक (८६) झळकावले. तो एकदिवसीय सामन्यात सर्वाधिक धावा करणारा खेळाडू देखील ठरला होता. आता वैभव सूर्यवंशी पुढील महिन्यात ऑस्ट्रेलियाचा दौऱ्यावर जाणार आहे. जिथे भारतीय १९ वर्षांखालील संघ तीन युवा एकदिवसीय सामने आणि दोन युवा कसोटी सामने खेळणार आहे.
हेही वाचा : IPL : संजू सॅमसन RR ला सोडचिठ्ठी देणार! संघ व्यवस्थापनाकडे केली त्याला सोडण्याची विनंती..
वैभव सूर्यवंशी ऑस्ट्रेलिया दौऱ्यापूर्वी त्याच्या आयपीएल संघ असणाऱ्या राजस्थान रॉयल्ससोबत सराव करत आहे. ज्याचा व्हिडिओ राजस्थान रॉयल्सने देखील शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये वैभव सूर्यवंशीने अगदी सरळ शॉट फटकवला. हा शॉट असा होता की त्यामुळे कॅमेरा क्रूला थेट रुग्णालयात जावे लागलॆ असते. तथापि, कॅमेरा क्रू त्या शॉटमधून थोडक्यात बचावला आहे. त्यानंतर वैभवने लगेच त्यांची माफी देखील मागितली. ज्याचा व्हिडिओ आत व्हायरल होत आहे.
POV: You’re Vaibhav Sooryavanshi 🔥🚀 pic.twitter.com/G2ryQEFQic — Rajasthan Royals (@rajasthanroyals) August 7, 2025
आयपीएल २०२५ च्या मेगा लिलावात १४ वर्षीय सूर्यवंशीला राजस्थान रॉयल्सकडून १.१० कोटींच्या बोलीत संघात सामाविष्ट करून घेतले. वैभवने १९ एप्रिल रोजी जयपूरमधील सवाई मानसिंग स्टेडियमवर लखनौ सुपर जायंट्सविरुद्ध आपला पहिला आयपीएल सामना खेळला. त्याने शार्दुल ठाकूरच्या पहिल्या चेंडूवर षटकार मारून आपले खाते उघडले आणि जगाला आपल्या क्षमतेची जाणीव करून दिली.
२८ एप्रिल रोजी गुजरात टायटन्स विरुद्ध त्याच्या तिसऱ्या आयपीएल सामन्यात सूर्यवंशीने २१० धावांचा पाठलाग करताना डावाची सुरुवात केली आणि फक्त ३५ चेंडूत शतक ठोकून संघाला ८ विकेटने दणदणीत विजय मिळवून दिला. त्याच्या या कामगिरीने क्रीडा विश्वाचे लक्ष त्याने वेधून घेतले. तसेच तो ३५ चेंडूत ठोकलेल्या या शतकामुळे सूर्यवंशी टी-२० क्रिकेटमध्ये शतक करणारा सर्वात तरुण फलंदाज ठरला.