Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Thackeray Brothers Alliance |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Vijay Hazare Trophy 2025 : लिस्ट ए क्रिकेटमध्ये पठ्ठ्याने घडवला इतिहास! ध्रुव शौरीने लगावले सर्वाधिक लागोपाठ शतके

बीसीसीआयने आयोजित केलेल्या विजय हजारे ट्रॉफीमध्ये हैदराबादविरुद्ध शानदार शतक झळकवून विदर्भाचा विश्वासार्ह फलंदाज असणाऱ्या ध्रुव शौरीने इतिहास घडवला आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Dec 27, 2025 | 05:12 PM
Vijay Hazare Trophy 2025: This player has created history in List A cricket! Dhruv Shorey has scored the most consecutive centuries.

Vijay Hazare Trophy 2025: This player has created history in List A cricket! Dhruv Shorey has scored the most consecutive centuries.

Follow Us
Close
Follow Us:

Dhruv Shauri made history :  विदर्भाचा विश्वासार्ह फलंदाज असणाऱ्या ध्रुव शौरीने बीसीसीआयने आयोजित केलेल्या विजय हजारे ट्रॉफीमध्ये हैदराबादविरुद्ध शानदार शतक झळकवून इतिहास घडवला आहे. हैदराबादविरुद्धच्या शतकासह, तो लिस्ट ए क्रिकेटमध्ये सर्वाधिक सलग शतके ठोकणारा संयुक्त पहिला खेळाडू ठरला आहे. ७७ चेंडूचा सामना करत नाबाद १०९ धावा काढत, शौरीने लिस्ट ए क्रिकेटमध्ये सर्वाधिक सलग शतके ठोकण्याच्या विक्रमाची बरोबरी साधली आहे. यापूर्वी या विक्रम केवळ नारायण जगदीसनच्या नवे जमा होता.

हेही वाचा : AUS vs ENG : “आम्ही जगात कुठेही गेलो तरी…” मेलबर्नमध्ये चौथा अ‍ॅशेस कसोटी सामना जिंकल्यावर बेन स्टोक्सचे विधान चर्चेत…

तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करण्यास उतरणाऱ्या, शौरीने अमन मोखाडे आणि यश राठोड यांच्यातील १४८ धावांच्या मजबूत सलामी भागीदारीचा पुरेपूर फायदा उठवला. त्याच्या संयमी आणि आक्रमक खेळीमध्ये शौरीने नऊ चौकार आणि तीन षटकार लगावले. ज्यामुळे विदर्भाने प्रथम फलंदाजी करताना ३६५/५ अशी मोठी धावसंख्या गाठली. लिस्ट ए क्रिकेटमधील हे त्याचे आठवे शतक ठरले.

गेल्या वर्षी शोरीचे नाणे खणखणीत वाजले

२०२४-२५ च्या विजय हजारे ट्रॉफीच्या बाद फेरीच्या सामन्यांपासून शौरीचे नाणे खणखणीत वाजले. गेल्या हंगामात त्याने क्वार्टरफायनल, सेमीफायनल आणि फायनलमध्ये सलग शतके लागावली होती. करुण नायरसोबत शौरीने विदर्भाच्या अंतिम फेरीत पोहोचण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्या हंगामात त्याने आठ डावांमध्ये ७०.४७ च्या सरासरीने आणि ९२.६८ च्या स्ट्राईक रेटने ४९४ धावा फटकावल्या आणि  संघाचा दुसरा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला होता.

शौरीची सलग पाच शतके

  1. ११० (११०) विरुद्ध कर्नाटक
  2. ११४ (१२०) विरुद्ध महाराष्ट्र
  3. ११८* (१३१) विरुद्ध राजस्थान
  4. १३६ (१२५) विरुद्ध बंगाल
  5. १०९ (७७) विरुद्ध हैदराबाद
शौरीने या हंगामातही उत्तम सुरुवात साधली केली. बंगालविरुद्ध त्याने १२५ चेंडूत १३६ धावांची खेळी केली.एक उल्लेखणीय आहे की, जगदीसनने २०२२-२३ च्या हंगामात सलग पाच सामन्यांमध्ये शतके झळकावली आहेत, अरुणाचल प्रदेशविरुद्ध विक्रमी २७७ धावा केल्या. लिस्ट ए क्रिकेटमध्ये ही सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या ठरली आहे.

हेही वाचा : AUS vs ENG : “तो संघ सर्वोत्तम नव्हताच…” इंग्लंडविरुद्धची कसोटी ड्रॉ राखणाऱ्या भारतीय संघाबद्दल दिग्गज खेळाडू काय बोलून गेला

या प्रतिष्ठित यादीमध्ये देवदत्त पडिककल, कुमार संगकारा आणि अल्विरो पीटरसन सारख्या दिग्गजांचा देखील समावेश असून ज्यांनी सलग चार शतके झळकावलेली आहेत. संगकारा हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सलग शतके झळकावणारा एकमेव फलंदाज असून शौरीची कामगिरी केवळ विदर्भासाठीच नाही तर भारतीय स्थानिक क्रिकेटसाठी देखील एक मोठा मैलाचा दगड मानला जात आहे.

Web Title: Vijay hazare trophy dhruv shorey creates history by scoring consecutive centuries in list a cricket

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 27, 2025 | 05:07 PM

Topics:  

संबंधित बातम्या

विराट कोहलीला आऊट केल्यानंतर फलंदाजाने स्वत: दिले गोलंदाजाला खास गिफ्ट! सोशल मिडियावर Photo Viral
1

विराट कोहलीला आऊट केल्यानंतर फलंदाजाने स्वत: दिले गोलंदाजाला खास गिफ्ट! सोशल मिडियावर Photo Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.