बेन स्टोक्स(फोटो-सोशल मीडिया)
Ben Stokes’ statement after winning the fourth Test match : ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातील अॅशेस मालिकेतील चौथा कसोटी सामना इंग्लंडने ४ विकेट्स जिंकला आणि २०११ पासून ऑस्ट्रेलियन भूमीवर कसोटी विजयासाठी इंग्लंडची प्रतीक्षा अखेरची संपली आहे. इंग्लंडसाठी हा विजय मनोबल वाढवणारा आहे. इंग्लंडने आधीच मालिका गमावली होती. इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने या विजयानंतर आपली प्रतिक्रिया देत म्हटले आय, विजय खूप छान वाटतो तसेच संघाच्या खेळाडूंनी हे साध्य करण्यासाठी कठोर मेहनत केली आहे. बेन स्टोक्सकडून पहिल्या डावात पाच विकेट्स घेणाऱ्या जोश टँग आणि दुसऱ्या डावात ४० धावा काढणाऱ्या जेकब बेथेलचे कौतुक देखील करण्यात आले.
विजयायनंतर बेन स्टोक्स म्हणाला की, “जिंकणे खरोखर चांगले वाटते. यासाठी सर्वांनी खूप मेहनत घेतली असून हा विजय अविश्वसनीयपणे खास आहे. आम्ही फक्त स्वतःसाठी नाही तर अनेक लोकांसाठी खेळत होतो. जगात कुठे देखील गेलो तरी आम्हाला प्रचंड पाठिंबा मिळत असतो. आवाज, जयजयकार, जयजयकार. आम्ही सर्वजण ते ऐकत असतो आणि अनुभवतो. मला माहित आहे की आमचे बरेच चाहते सध्या उत्साहित असणार आहेत.”
बेन स्टोक्स म्हणाला की, “या सामन्यापूर्वी बरेच काही घडून गेले आहे. पण मुलं ज्या पद्धतीने मैदानावर उतरले, लक्ष केंद्रित केले आणि कामगिरी केली ते या संघाबद्दल बरेच काही सांगणारे आहे. खेळाडू, सहाय्यक कर्मचारी आणि व्यवस्थापनाला जे आवश्यक आहे त्यावर लक्ष केंद्रित केल्याबद्दल त्यांचे खूप मोठे श्रेय आहे. आम्हाला माहित होते की हा सोपा पाठलाग नव्हता. खेळपट्टीमध्ये बरेच काही होते आणि गोलंदाज नेहमीच खेळामध्ये होते. सकारात्मक राहण्याचा, गोलंदाजांना स्थिर होऊ न देण्याचा आणि कठीण क्षेत्रांवर मारा करत राहण्याचा संदेश दिला होता. मला असे वाटले की आम्ही दाखवलेला हेतू आणि शिस्त शानदार अशीच होती. त्यासाठी धैर्याची आवश्यकता होती, परंतु मुलांनी ते खूप चांगल्या प्रकारे हाताळले आहे.”
हेही वाचा : AUS vs ENG : हॅरी ब्रूकचा कसोटी क्रिकेटमध्ये भीम पराक्रम! सर्वात जलद ३००० धावा करत रचला खास इतिहास
इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि ऑस्ट्रेलियाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केएल. ऑस्ट्रेलिया संघ फक्त १५२ धावाच करू शकला. प्रत्युत्तरात, इंग्लंडचा पहिला डाव ११० धावांवर गडगडला, ज्यामुळे ऑस्ट्रेलियाला ४२ धावांची आघाडी घेता आली. दुसऱ्या डावात इंग्लंडने शानदार गोलंदाजी करत ऑस्ट्रेलियाला १३२ धावांवर गारद केले. इंग्लंडला १७५ धावांचे लक्ष्य देण्यात आले होते, पण इंग्लंडने हे लक्ष्य फक्त ६ विकेट गमावून पूर्ण केले. सामन्यात सात विकेट्स घेणाऱ्या इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोश टोंगला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले.






