फोटो सौजन्य - सोशल मीडिया
विराट कोहली – केएल राहुल : बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमध्ये भारताच्या संघाने निराशाजनक कामगिरी केली त्यामुळे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात टीका करण्यात आली होती. त्याचबरोबर भारताचा कर्णधार रोहित शर्माच्या खराब कामगिरीमुळे बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमध्ये अनेक धक्कादायक निर्णय घेण्यात आले होते. केएल राहुलने संघासाठी कमालीची कामगिरी केली आहे, परंतु त्याला ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या मालिकेमध्ये फार काही कोणाची साथ मिळाली नाही. आता भारताचा संघ आगामी मालिकेमध्ये इंग्लंडचा सामना करणार आहे. भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यामध्ये पाच सामान्यांची T२० मालिका आयोजित करण्यात आली आहे. त्यानंतर चॅम्पियन ट्रॉफीआधी एकदिवसीय सामान्यांची मालिका टीम इंडिया खेळणार आहे.
त्याआधी सध्या भारतामध्ये देशांतर्गत सामने सुरु आहेत. बॉर्डर गावस्कर ट्रॉफीच्या पराभवानंतर भारताच्या संघाचे कोच गौतम गंभीर यांनी देशांतर्गत क्रिकेट खेळण्याचे आदेश खेळाडूंना दिले आहेत. बीसीसीआयने नुकतेच भारतीय संघाच्या खेळाडूंना देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळणे अनिवार्य केले होते, त्यानंतर रोहित शर्मा आणि विराट कोहली सारख्या वरिष्ठ खेळाडूंनी आपापल्या संघांच्या वतीने रणजी ट्रॉफी खेळण्याची त्यांची उपलब्धता व्यक्त केली होती. आता विराट आणि केएल राहुल रणजी क्रिकेट खेळण्याबाबत एक मोठे अपडेट समोर आले आहे, ज्यामध्ये असे सांगण्यात आले आहे की हे दोन्ही क्रिकेटपटू दुखापतीमुळे पुढील फेरीच्या सामन्यात खेळू शकणार नाहीत.
‘ईएसपीएन क्रिकइन्फो’च्या रिपोर्टनुसार, विराटला मानदुखीचा त्रास आहे, ज्याचा तो ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या बॉर्डर गावस्कर मालिकेपासून सामना करत आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सिडनी कसोटीनंतर त्याला मान दुखू लागली, त्यानंतर त्याने ८ जानेवारीला इंजेक्शन घेतले. कोहली अजूनही यातून सावरला नाही आणि त्याने बीसीसीआयच्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांना याची माहिती दिली आहे.
Virat Kohli (neck pain) and KL Rahul (elbow issues) are unavailable for the next round of Ranji Trophy starting from 23rd January. (Espncricinfo). pic.twitter.com/2qXOSeyqXN
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) January 18, 2025
दुसरीकडे, राहुलला सध्या कोपराची दुखापत आहे आणि त्यामुळे तो पंजाबविरुद्धच्या सामन्यात कर्नाटक संघासाठी सहभागी होऊ शकणार नाही. रणजी ट्रॉफीच्या पुढील फेरीला ३० जानेवारीपासून सुरुवात होणार आहे. त्यामुळे मुंबईसाठी यशस्वी जैस्वाल आणि रोहित शर्मा यांच्यावर सस्पेन्स आहे. तर शुभमन गिल पंजाबकडून, ऋषभ पंत दिल्लीसाठी आणि रवींद्र जडेजा सौराष्ट्रकडून स्पर्धेच्या पुढील फेरीत खेळण्यास तयार आहे.
बीसीसीआय शनिवारी, १८ जानेवारी रोजी भारताच्या चॅम्पियन्स ट्रॉफी संघाची घोषणा करणार आहे, मुख्य निवडकर्ता अजित आगरकर आणि कर्णधार रोहित पत्रकार परिषदेला संबोधित करणार आहेत. काही खेळाडूंवर सस्पेन्स आहे. या मेगा इव्हेंटपूर्वी भारत इंग्लंडविरुद्ध पाच टी-२० आणि तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळणार आहे.