Ranji Trophy 2024-25: तब्बल १० वर्षांनी विराट कोहली रणजी खेळणार? इशांत शर्माला मात्र डच्चू
राजधानी: लवकरच रणजी ट्रॉफी २०२४-२०२५ स्पर्धा सुरू होणार आहे. यासाठी प्रत्येक संघ आपापले खेळाडू निवडत आहे. दरम्यान रणजी ट्रॉफीसाठी दिल्लीच्या संघाने आपल्या संघाची निवड केली आहे. दरम्यान भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि यशस्वी फलंदाज विराट कोहली दिल्ली संघाकडून रणजी ट्रॉफी खेळताना दिसणार आहे. विराट कोहलीचा दिल्लीच्या संघात समावेश करण्यात आला आहे. असे झाल्यास विराट कोहली १२ वर्षानंतर रणजी ट्रॉफी खेळताना दिसू शकतो. भारताचा यष्टीरक्षक रिषभ पंतचा देखील दिल्लीच्या संघात समावेश करण्यात आला आहे. तर वेगवान गोलंदाज इशांत शर्माला मात्र डच्चू देण्यात आला आहे.
विराट कोहली याआधी १२ वर्षांपूर्वी म्हणजेच २०१२-२०१३ या वर्षात दिल्ली संघाकडून रणजी ट्रॉफी खेळला होता. त्यानंतर २०१९-२०२० च्या संघात विराट कोहलीचा समावेश करण्यात आला होता. मात्र त्यावेळेस विराट रणजी खेळला नव्हता. मात्र आता यंदाच्या वर्षात विराट रणजी ट्रॉफी खेळण्याची शक्यता आहे. रणजी ट्रॉफी सुरू होण्याच्या वेळेसच भारत हा न्यूझीलंडविरुद्ध कसोटी सामने खेळणार आहे. त्यामुळे विराट कोहली रणजी ट्रॉफी खेळण्याची शक्यता कमी आहे.
भारतीय संघ सध्या बांगलादेशविरुद्ध त्यानंतर अनुक्रमे न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी सामने खेळणार आहे. अशा परिस्थिती विराट कोहलीचा समावेश दिल्लीच्या संघात रणजी ट्रॉफीसाठी होणे आश्चर्यजनक आहे. बीसीसीआय विराट कोहलीला रणजी खेळण्याची परवानगी देण्याची शक्यता कमी आहे. रणजी ट्रॉफी स्पर्धा ११ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे.
विराट कोहली, ऋषभ पंत, हिम्मत सिंग, प्रांशु विजयन, अनिरुद्ध चौधरी, क्षितीज शर्मा, वैभव कांडपाल, सिद्धांत बन्सल, समर्थ सेठ, जॉन्टी सिद्धू, सिद्धू शर्मा, नवदीप शर्मा, नवाबला सैनी, हर्ष त्यागी, लक्ष्य थरेजा, सुमित माथूर, शिवांक वशिष्ठ, सलील मल्होत्रा, आयुष बडोनी, गगन वत्स, राहुल एस डागर, हृतिक शौकीन, मयंक रावत, अनुज रावत (विकेटकीपर), सिमरजीत सिंग, शिवम कुमार त्रिपाठी, कुलदीप यादव, ललित यादव, प्रिन्स चौधरी, शिवम किशोर कुमार, शिवम गुप्ता (वि), वैभव शर्मा, जितेश सिंग, रोहित यादव, सुमित कुमार, अनमोल शर्मा, केशव डबा, सनत संगवान, शुभम शर्मा (वि.)
DDCA announced their Ranji Trophy Probables Today. The U23 teams will be selected from the below mentioned players only.
Indian Test team members Virat Kohli and Rishabh Pant have been included in the list of players as well, first time since 2019. pic.twitter.com/oiQ0ZGYCf3
— CricDomestic (@CricDomestic_) September 24, 2024
आर्यन चौधरी, आर्यन राणा , भगवान सिंग, प्रणव राजवंशी (वि), सौरव डागर, मणी ग्रेवाल, कुंवर बिधुरी, निखिल सांगवान, पुनीत चहल, प्रियांश आर्य, यश धुल, प्रिन्स यादव, हर्षित राणा, मयंक यादव, सुयश शर्मा, अर्पित राणा, दिविज मेहरा, सुजय मेहरा. सिंग, हार्दिक शर्मा, हिमांशू चौहान, आयुष डोसेजा, अंकित राजेश कुमार, ध्रुव कौशिक, अंकुर कौशिक, क्रिश यादव, वंश बेदी, यश सेहरावत, विकास सोलंकी, राजेश शर्मा, तेजस्वी दहिया (यष्टीरक्षक), रौनक वाघेला, राहुल गेहलोत सिंग, मनप्रीत सिंग. , आर्यन सेहरावत, शिवम शर्मा, सिद्धार्थ शर्मा, पर्व सिंगला, योगेश सिंग, दीपेश बल्यान, सागर तन्वर, ऋषभ राणा, अखिल चौधरी, दिग्वेश राठी, सार्थक रंजन, अजय गुलिया.