फोटो सौजन्य - X
भारतामध्ये सध्या तणावाचे वातावरण आहे, त्यामुळे काही काळासाठी आयपीएलदेखील स्थगित करण्यात आली आहे. याचदरम्यान भारताचा कर्णधार रोहीत शर्मा यानेे कसोटी क्रिकेटला अलविदा केला. तर आज सकाळी भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीच्या पोस्टने जगभरामध्ये खळबळ उडवली आहे. १२ मे हा दिवस क्रिकेट चाहत्यांसाठी एक संस्मरणीय दिवस असेल, कारण या दिवशी विराट कोहलीने कसोटी क्रिकेटला निरोप दिला.
मात्र, विराटच्या निवृत्तीबद्दल अनेक दिवसांपासून चर्चा सुरू होती. पण आता विराट कोहलीने निवृत्ती घेऊन या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. विराटच्या निवृत्तीवर जगभरातून प्रतिक्रिया येत आहेत. या संदर्भात, एका वरिष्ठ भारतीय लष्करी अधिकाऱ्याचे नावही जोडले गेले. भारत-पाकिस्तान तणावाच्या काळात त्याने विराटबद्दल एक मोठी गोष्ट सांगितली आहे.
विराट कोहलीच्या निवृत्तीनंतर त्याच्या चाहत्यांमध्ये दुःख आहे. विराट हा जगातील सर्वोत्तम कसोटी खेळाडूंपैकी एक होता. जगभरातील बहुतेक चाहत्यांना विराट कोहलीला कसोटी क्रिकेट खेळताना पाहायचे होते. तथापि, आता तो भारतासाठी पांढऱ्या जर्सीमध्ये दिसणार नाही. हे आता ठरवण्यात आले आहे. विराटच्या निवृत्तीनंतर भारतीय डीजीएमओ राजीव घई म्हणाले की, विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे, आज क्रिकेटबद्दल बोलण्याचा दिवस नाही. प्रत्येक भारतीयाप्रमाणे, तो नेहमीच माझा आवडता आहे. भारतीय डीजीएमओ यांनी विराटबाबतच्या त्यांच्या वक्तव्याद्वारे स्पष्ट केले की, विराटच्या निवृत्तीबद्दल त्यांनाही दुःख आहे.
INDIAN DGMO RAJIV GHAI. 🗣️
“Virat Kohli has taken retirement from Test cricket, today is not the day to talk about cricket. Like every Indian, he’s always my favourite”. 🫡❤️ pic.twitter.com/q9RONb65DK
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) May 12, 2025
भारतीय क्रिकेटमध्ये विराट कोहली हे नाव आल्यापासून भारतातल्या स्टारला एक बॅन्ड म्हणून ओळखले जात होते. त्याला फक्त भारतातचं नाही तर संपूर्ण जगभरामध्ये प्रेम मिळत राहिले. भारताचा संघ पुढील महिन्यात इंग्लंड दौऱ्यावर असणार आहे त्याआधी भारताचा कर्णधार रोहित शर्मा याने निवृत्तीची घोषणा केल्यानंतर विराट कोहलीच्या या रिटायरमेंटच्या पोस्टने सर्वांना धक्का बसला. रोहित शर्मा आणि विराट कोहली हे दोघेही आता फक्त एक दिवसीय क्रिकेटमध्ये खेळताना दिसणार आहे.