फोटो सौजन्य - ANI
Virat Kohli’s post-retirement video from Test cricket : रोहीत शर्मानंतर आज विराट कोहलीने सोशल मिडीयावर पोस्ट शेअर करून सर्वांनाच धक्का दिला. भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीने सोशल मिडीयावर पोस्ट शेअर करून कसोटी क्रिकेटमधून निवृतीची घोषणा केली आहे. त्यानंतर आता साेशल मिडीयावर एक व्हिडीओ वाऱ्यासारखा व्हायरल होत आहे. विराट कोहली सध्या आयपीएल २०२५ मध्ये आरसीबीकडून खेळत आहे. भारत आणि पाकिस्तानमधील तणावामुळे आयपीएल एका आठवड्यासाठी पुढे ढकलण्यात आली आहे.
रोहित शर्मानंतर आज म्हणजेच १२ मे २०२५ रोजी विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा करून सर्वांना आश्चर्यचकित केले आहे. त्याच्या इंस्टाग्राम पोस्टद्वारे कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची माहिती शेअर केल्यानंतर, किंग कोहली त्याची पत्नी अनुष्का शर्मासोबत मुंबई विमानतळावर दिसला. या जोडप्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.
विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. कोहलीने त्याच्या कारकिर्दीत १२३ कसोटी सामने खेळून ९२३० धावा केल्या आहेत, ज्यामध्ये त्याच्या बॅटमधून ३० शतके आणि ३१ अर्धशतकांचा समावेश आहे. कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर काही वेळातच विराटला त्याची पत्नी अनुष्का शर्मासोबत मुंबई विमानतळावर पाहिले गेले. वृत्तसंस्था एएनआयने त्यांचा व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये हे जोडपे चेहऱ्यावर हास्य घेऊन विमानतळावर एकत्र पाहायला मिळाले.
#WATCH | Virat Kohli and Anushka Sharma spotted at Mumbai airport, today pic.twitter.com/G12dMhcqwr
— ANI (@ANI) May 12, 2025
व्हिडिओमध्ये विराट पांढरी पँट, ऑफ-व्हाइट ओव्हरसाईज शर्ट, ऑलिव्ह ग्रीन स्नीकर्स आणि ब्राऊन कॅप घातलेला दिसत आहे, तर अनुष्का डेनिम जीन्स आणि गुलाबी ओव्हरसाईज शर्ट घातलेली दिसत आहे. दोन्ही जोडप्यांना कॅज्युअल लूकमध्ये पाहून चाहते खूप आनंदी दिसत आहेत.
विराट कोहली आणि त्याची पत्नी अनुष्का शर्माचा व्हिडिओ पाहिल्यानंतर असा अंदाज लावला जात आहे की ते लंडनला त्याच्या दुसऱ्या घरी जात आहेत. अनुष्काने परदेशात तिच्या दुसऱ्या मुलाला अकाय जन्म दिला त्याचबरोबर त्यांंना एक मुलगी देखील आहे तिचे नाव वामिका आहे. सध्या हे दोघे लंडनला जात आहेत असा अंदाज लावला जात आहे.
भारताचा माजी कर्णधार विराट कोहली याने टीम इंडीयासाठी आतापर्यत कमालीची कामगिरी केली आहे, त्याने त्याच्या नावावर अनेक विक्रम केले आहेत. क्रिकेट विश्वामध्ये विराट कोहली हा सर्वात्तम फलंदाज म्हणून त्याची ओळख आहे.