'Virat sat crying in the bathroom..', what exactly happened at that time? Yuzvendra Chahal made a big revelation
Yuzvendra Chahal on virat kohli : टीम इंडियाचा अनुभवी फिरकीपटू युझवेंद्र चहल नेहमी चर्चेत असतो. कधी तो मैदानाच्या कारणाने चर्चेत असतो तर कधी त्याच्या खाजगी आयुष्यामुळे देखील तो चर्चेत येत असतो. सद्या चहल नुकत्याच एका पॉडकास्टमुळे चर्चेत आला आहे. यामध्ये त्याने त्याच्या खाजगी आयुष्यात आल्या चढ-उतारांबाबत चर्चा केली आहे. काही खुलासे देखील केले आहेत. तसेच त्याने भारताचा महान फलंदाज विराट कोहलीबद्दल देखील खुलासा केला आहे. त्याने सांगितले की, एका सामन्यात भारताचा अनुभवी फलंदाज विराट कोहली बाथरुममध्ये रडत होता.
चहलने सांगितले की, भारताला आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2019 च्या उपांत्य फेरीत न्यूझीलंडने भारताचा परावभव केला होता. याच सामन्यादरम्यान त्याने स्वत:ला बाथरुममध्ये कोंडून घेऊन विराट रडत बसला होता, असा खुलासा चहलने केला आहे. तसेच चहलने हे देखील सांगितले की, मी जेव्हा विराटच्या जवळून गेलो तेव्हाही देखील त्याच्या डोळ्यात अश्रू होते.
चहलने विराटबाबत कोणता खुलासा केला?
राज शमामी यांच्यासोबतच्या पॉडकास्ट मुलाखतीत चहलने सांगितले की, “मी 2019 वर्ल्ड कपमध्ये विराटला बघितलं आहे. तो बाथरुममध्ये रडत होता. त्यानंतर मी त्याच्या जवळून जात असताना तेव्हा देखील विराटच्या डोळ्यात अश्रू दिसत होते.”, विराट कोहली त्या उपांत्य फेरीत आपली छाप पडू शकला नाही. विराट त्या सामन्यामध्ये 1 धाव करुन बाद झाला होता.
न्यूझीलंडने उपांत्य फेरीत 50 षटकांमध्ये 8 विकेट्स गमावून 239 धावा केल्या होत्या. या सामन्यात न्यूझीलंड संघ आपल्या धावांचा बचाव करण्यात यश मिळवले होते. न्यूझीलंडने भारताला 221 धावांवर गुंडाळलं होतं. त्या सामन्यात ऑलराउंडर रवींद्र जडेजा याने सर्वाधिक 77 धावांची खेळी केली होती. तर महेंद्रसिंह धोनीने 50 धावा काढल्या होत्या. त्यामुळे भारताचं अंतिम फेरीचं धडक मारण्याचं स्वप्न उध्वस्त झाल होतं.
हेही वाचा : IND vs ENG : यशस्वी जयस्वालने लिहिला इतिहास! ‘या’ भीम पराक्रमाला गवसणी घालणारा तो एकमेव भारतीय फलंदाज
आंतरराष्ट्रीय क्रिकटमध्ये युझवेंद्र चहल महेंद्रसिंह धोनी, विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्या नेतृत्वात खेळलेला आहे. चहलने या मुलाखतीत विराट आणि रोहितच्या नेतृत्वाबाबत देखील प्रतिक्रिया दिली आहे. चहलने म्हटले की, “मला रोहित शर्माचा मैदानातील स्वभाव फार आवडतो. तो एक चांगला कर्णधार आहे. विराटबाबत तर त्याच्यात दररोज तोच जोश आणि उत्साह दिसुन येतो.”