यशस्वी जयस्वाल(फोटो-सोशल मीडिया)
IND vs ENG 5th Test : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचवा सामना ओव्हल येथे खेळला जात आहे. हा सामना चांगलाच रंगतदार वळणावर आला आहे. या सामन्यात भारताने दुसऱ्या डावात २ गडी गमावून १०५ धावा केल्या असून भारताकडे ८२ धावांची आघाडी आहे. दुसऱ्या दिवशी भारताचा सलामीवीर यशस्वी जैस्वालने अर्धशतक झळकावून भारताला आघाडी मिळवून दिली. त्याने आपल्या कारकिर्दीतील १३ वे अर्धशतक आहे. या दरम्यान जैस्वालने एक मोठी कामगिरी देखील केली आहे. ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड दौऱ्यावर ३०० पेक्षा जास्त धावा करण्याचा पराक्रम करणारा जयस्वाल हा भारतीय कसोटी क्रिकेटमधील एकमेव फलंदाज ठरला आहे.
दुसऱ्या दिवसाच्या अखेरीस जयस्वालने आपले अर्धशतक पूर्ण केले. दुसऱ्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा भारताने २ गडी गमावून ७५ धावा केल्या होत्या. या दरम्यान जयस्वालने मोठा विक्रम केला आहे. त्याने ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर २०२४-२५ मध्ये ३९१ धावा केल्या होत्या. त्याच वेळी, जयस्वालने आतापर्यंत इंग्लंड दौऱ्यावर ३४४ धावा केल्या आहेत. यासह, ओव्हलमध्ये पाहुणा सलामीवीर फलंदाजाकडून १०० पेक्षा अधिकच्या स्ट्राईक रेटने ५० पेक्षा अधिक धावा करणारा जयस्वाल जगातील तिसरा फलंदाज बनला आहे. जयस्वालच्या आधी ओव्हलमध्ये १०० हुन अधिक स्ट्राईक रेटने ५० हुन अधिक धावा श्रीलंकेच्या पथुम निस्सांका आणि वेस्ट इंडिजच्या ख्रिस गेलने केल्या आहेत.
ओव्हलमध्ये १००+ स्ट्राईक रेटने ५०+ धावा करणारे पाहुणे सलामीवीर फलंदाज
२ – पथुम निस्सांका (२०२४)
१ – ख्रिस गेल (२००४)
१* – यशस्वी जयस्वाल (२०२५)
तसेच २३ व्या वर्षी सेना देशांमध्ये भारतासाठी सर्वाधिक कसोटी ५०+ धावा करणारा जयस्वाल दुसराच फलंदाज ठरला आहे, सेना देशांमध्ये जयस्वालच्या या सातव्या ५०+ धावा आहेत. सचिन तेंडुलकर या बाबतीत अव्वल स्थानावर आहे. सचिनने २३ व्या वर्षी सेना देशांमध्ये ११ वेळा ५० हुन अधिक धावा करण्याची किमया केली होती.
हेही वाचा : IND vs ENG : जो रूट एक्सप्रेसचे ब्रेक फेल; एक एक विक्रम उध्वस्त! सचिन तेंडुलकरच्या ‘त्या’ विक्रमाला लोळवले