New Zealand Tour Of India
IND vs NZ 2nd Test : भारत विरुद्ध न्यूझीलंड कसोटी सामन्यात टीम इंडियाने आपली रणनीती राखून ठेवली. मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी आज पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली. वॉशिंग्टन सुंदर हा संघाचा भाग असणार, तरीही उद्याच सर्व अंदाज घेऊन ठरवणार प्लेईंग इलेव्हन तसेच आम्ही उद्या पिच आणि नाणेफेक आमच्यासाठी महत्त्वाची राहणार आहे. हे सर्व पाहूनच खेळाडूंची यादी ठरवू, शुभमन गिल आणि वाॅशिंग्टन संदर निश्चितच संघाचे भाग राहतील परंतु पिच आणि इतर सर्व बाजू पाहूनच आम्ही निर्णय घेणार असल्याचे गौतम गंभीर यांने सांगतिले. यांमध्ये निश्चितच केएल राहुलचा पत्ता कट होण्याची शक्यता आहे.
पुणे टेस्ट जिंकण्याच्या उद्देशाने प्लेईंग इलेव्हन
उद्या आम्ही पिचचा अंदाज घेऊन खेळाडू ठरवणार आहोत. तरी आपल्या येथे टॅलेंट एवढे आहे की, कोणता खेळाडू ठेवायचा कोणता काढायचा हा मोठा प्रश्न आमच्यासमोर असतो. तरी आम्ही यावर निश्चितच उपाय काढून विजयासाठी आवश्यक तयारी करू. असे नाही की हा फक्त पुण्यात प्रश्न येतो असा प्रश्न अनेक ठिकाणी येतो त्याचे कारण म्हणजे भारतात टॅलेंट खूप आहे.
आपल्याकडे भरपूूनर टॅलेंट
इंडियाची प्लेईंग इलेव्हन निवडणे फक्त पुण्यात निवडणे अवघड आहे असे नाही तर कुठेही निवडणे अवघड आहे. शुभमन गिलने अजूनही प्लेईंग इलेव्हनमध्ये घेतलेले नाही. मागच्या सामन्यात त्याच्या मानेच्या दुखण्यामुळे बाहेर ठेवले होते. इन्जरीमुळे ते बाहेर होते. तरी आम्ही ही टेस्ट जिंकण्याच्या उद्देशाने प्लेईंग इलेव्हन तयार करणार आहोत. त्यामुळे आता आम्ही बोलणार नाही.
शुभमन गिल दुखापतीतून सावरला
शुभमन गिल दुखापतीतून सावरत पुन्हा एकदा भारतीय संघात खेळण्यासाठी सज्ज झाला आहे. आम्ही मागील सामन्यात जरी पराभूत झालो असलो तरी या सामन्यात जोरदार पुनरागमन करीत पुन्हा बाऊन्सबॅक करू, असा विश्वास भारतीय संघाचे कोच रियान टेन यांनी व्यक्त केला. दरम्यान, भारतीय संघाचे अस्टिटंट कोच यांनी कालच स्पष्ट केले की, ते आणखी एक गोलंदाजाला या टीममध्ये फिट करू इच्छितात, त्यामुळे एक फलंदाज नक्कीच बाहेर राहील यामध्ये सरफराज खान आणि केएल राहुल यांच्यात एकाला कोणाला तरी संघाबाहेर ठेवावे लागणार आहे. आता पिच पाहिल्यानंतरच यावर निर्णय होईल यामध्ये वाॅशिंग्टन सुंदरला खेळवण्याचा इरादा आहे. असे मत रियान टेन डोयशे यांनी व्यक्त कालच व्यक्त केले होते. मग आज गौतम गंभीर यांनी सुंदर हा निश्चितच संघाचा भाग बनू शकतो.
सरफराज आणि केएल राहुल यांच्यात होणार रस्सीखेच
भारताचे सहाय्यक प्रशिक्षक रायन टेन ड्यूश यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत, न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीसाठी मधल्या फळीतील फलंदाज केएल राहुल आणि सरफराज खान यांच्यात रस्सीखेच होणार असल्याचे सांगितले. जरी मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर कर्नाटकच्या फलंदाजाला भरपूर संधी देण्यास उत्सुक आहेत. बंगळुरू येथील पहिल्या कसोटीत आठ गडी राखून पराभव पत्करावा लागल्यानंतर भारताने बाउन्स बॅक करण्याचा निर्धार केला आहे. आता वॉशिंग्टन सुंदरचाही संघात समावेश झाल्याने सर्वांचे लक्ष संघ संयोजनाकडे असेल. शुभमन गिल आणि ऋषभ पंत यांना गुरुवारपासून सुरू होणाऱ्या सामन्यासाठी पूर्णपणे तंदुरुस्त झाले आहेत.
भारत विरुद्ध न्यूझीलंड कसोटी सामना
दरम्यान, भारत विरुद्ध न्यूझीलंडचा कसोटी सामना पुण्याच्या गहुंजे स्डेडियवर खेळवला जाणार आहे. भारत विरुद्ध न्यूझीलंड दुसरा कसोटी सामना पुण्याच्या गहुंजे स्टेडियवर खेळला जाणार आहे. काल संध्याकाळी भारतीय संघाचे पुण्यात आगमन झाले. त्यानंतर आज न्यूझीलंडच्या संघाने सकाळी 9.30 वाजल्यापासून सरावाला सुरुवात केली. तर भारतीय संघाने 1.30 वाजता सरावाला सुरुवात केली.