फोटो सौजन्य - X
पहलगाम हल्ला झाल्यानंतर वर्ल्ड चॅम्पियन्स ऑफ लीजेंड्स 2025 ची स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर या स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान या दोन संघामध्ये देखील सामन्याते आयोजन करण्यात आले होते. यावेळी भारताच्या संघाने झालेल्या साखळी सामन्यामध्ये खेळण्यास मनाई केली आणि त्यानंतर सामना रद्द करण्यात आला होता. त्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये दुसऱ्यांदा या स्पर्धेमध्ये लढाई होणार होती पण पुन्हा भारतीय खेळाडूंनी हा सामना खेळण्यास नकार दिल्यामुळे सामना रद्द झाला आणि त्यामुळे पाकिस्तानच्या संघाला फायनलमध्ये खेळण्याची संधी मिळाली होती.
या लीगमध्ये भारतीय चॅम्पियन्सनी पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास नकार दिल्याने गोंधळ उडाला. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना दोनदा होणार होता आणि दोन्ही वेळा सामना रद्द करावा लागला. क्रिकेटमधून निवृत्त झालेले खेळाडू या लीगमध्ये खेळतात. भारताकडून इरफान पठाण, त्याचा भाऊ युसूफ, युवराज सिंग, हरभजन सिंग, सुरेश रैना, शिखर धवन यांसारखे खेळाडू या लीगमध्ये सहभागी झाले होते. धवनने सोशल मीडियावर पोस्ट केले होते की तो पाकिस्तान चॅम्पियन्सविरुद्ध खेळणार नाही.
आता या संघाचा भाग असलेल्या एका माजी खेळाडूने सांगितले आहे की इंडिया चॅम्पियन्सने हा निर्णय एका पाकिस्तानी खेळाडूमुळे घेतला होता. एनडीटीव्हीने आपल्या वृत्तात या संघातील एका सदस्याचा हवाला देत लिहिले आहे की इंडिया चॅम्पियन्सने शाहिद आफ्रिदीमुळे सामना न खेळण्याचा निर्णय घेतला होता कारण त्याने भारताविरुद्ध बरेच काही उलट सुलट बोलत होता. खेळाडूच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तात असे लिहिले आहे की, “तो निर्णय शाहिद आफ्रिदीविरुद्ध न खेळण्याचा होता. याचे कारण त्याने सतत देत असलेली विधाने होती.”
साखळी फेरीत भारताने पाकिस्तानविरुद्ध सामना न खेळण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर, ते उपांत्य फेरीतही पाकिस्तानविरुद्ध खेळले नाही. या कारणास्तव, पाकिस्तानला थेट अंतिम फेरीत प्रवेश मिळाला जिथे त्यांना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पराभव स्वीकारावा लागला. भारताने सामना न खेळण्याचा निर्णय घेतल्यानंतर, दोन्ही संघांना लीग टप्प्यात प्रत्येकी एक गुण देण्यात आला ज्यामुळे आफ्रिदी संतापला कारण त्याने म्हटले होते की भारताने सामना खेळण्यास नकार दिला आहे, आम्ही नाही. नंतर, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने या लीगवर बंदी घातली. आतापासून, पाकिस्तानी खेळाडू या लीगमध्ये दिसणार नाहीत.