फोटो सौजन्य - सोशल मीडिया
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 : पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या जिद्दीने सर्व पाकिस्तानी क्रिकेट चाहत्यांना भारी पडणार आहे. शुक्रवार 29 नोव्हेंबर रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने चॅम्पियन्स ट्रॉफी आयोजित करण्यासाठी बैठक घेतली, जी अनिर्णित राहिली. आयसीसीने पीसीबीला ही स्पर्धा हायब्रिड मॉडेलमध्ये आयोजित करण्याचा प्रस्ताव दिला होता, जो त्यांनी नाकारला. आता आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीबाबत आज ३० नोव्हेंबरला अंतिम निर्णय घेणार आहे. पीसीबीला शेवटची संधी दिली जाईल, जर ते मान्य झाले नाही तर ही स्पर्धा पाकिस्तानबाहेर आयोजित केली जाणार आहे आणि पाकिस्तान क्रिकेट संघाला देखील चॅम्पियन ट्रॉफीमधून बाहेर काढले जाऊ शकते.
क्रीडा संबंधित बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
शुक्रवारी होणाऱ्या आयसीसी बैठकीची सर्वांनाच प्रतीक्षा होती. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचा खोटा आडमुठेपणा संपणार की कायम राहणार हे प्रत्येकाला जाणून घ्यायचे होते. पुढील वर्षी फेब्रुवारी-मार्चमध्ये होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीबाबत बीसीसीआयने सुरक्षेच्या कारणास्तव भारतीय संघ पाकिस्तानमध्ये खेळणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. आयसीसीने आपले सामने पाकिस्तानबाहेर आयोजित करण्यासाठी हायब्रीड मॉडेलचा प्रस्ताव ठेवला होता परंतु पीसीबीने ते स्वीकारण्यास स्पष्टपणे नकार दिला आहे.
आयसीसी बोर्डाच्या एका सूत्राने सांगितले की, “चॅम्पियन्स ट्रॉफी सामन्यांचे प्रसारण करणारी कंपनी भारतीय संघ खेळत नसलेल्या कोणत्याही आयसीसी स्पर्धेसाठी पैसे देणार नाही. पाकिस्तान क्रिकेट बोर्डालाही हे चांगलेच माहीत आहे. पाकिस्तानने हायब्रीड मॉडेल स्वीकारण्यास नकार दिल्यानंतरच शनिवारी आयसीसीची बैठक होणार आहे. जर पाकिस्तानने हायब्रीड मॉडेल स्वीकारले नाही तर चॅम्पियन्स ट्रॉफी दुसऱ्या देशात आयोजित केली जाऊ शकते आणि त्यात पाकिस्तान संघाचा समावेश होणार नाही.
क्रीडा संबंधित बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
त्यापूर्वी कार्यकारी मंडळाची बैठक थोडक्यात झाली. पीसीबीचे अध्यक्ष मोहसीन नक्वी यांनी स्पष्ट केले की, भारतीय संघाला पाकिस्तान दौऱ्यासाठी त्यांच्या सरकारकडून मंजुरी मिळाली नसली तरी ते ‘हायब्रिड मॉडेल’ स्वीकारत नाहीत. “कार्यकारी मंडळाची आज एक संक्षिप्त बैठक झाली,” असे पूर्णवेळ आयसीसी सदस्य देशाच्या एका अधिकारी आणि बोर्ड सदस्याने पीटीआयला सांगितले. 2025 मध्ये होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी सर्व पक्ष सकारात्मक तोडगा काढण्यासाठी काम करत आहेत. बोर्डाची शनिवारी पुन्हा बैठक होऊन तोडगा निघेपर्यंत हे सुरू राहण्याची शक्यता आहे.
दरम्यान, दिल्लीतील परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) भूमिकेचा पुनरुच्चार केला की सुरक्षेच्या कारणास्तव भारतीय संघ पाकिस्तानला जाऊ शकत नाही. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारतीय संघ सहभागी होण्याच्या शक्यतेबद्दल परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याला नियमित पत्रकार परिषदेत विचारले असता ते म्हणाले, “बीसीसीआयने एक निवेदन जारी केले आहे. तिथे सुरक्षेची चिंता आहे आणि त्यामुळे टीम तिकडे जाण्याची शक्यता नाही असे त्यांनी म्हटले आहे.