
'नो-हॅन्डशेक' पॉलिसी केवळ दिखावा? (Photo Credit- X)
‘स्टिक टू क्रिकेट’ या प्रसिद्ध पॉडकास्टमध्ये बोलताना एलिस्टर कुकने भारत-पाकिस्तान संबंधांवर भाष्य केले. कुक म्हणाला की, “मैदानावर हात न मिळवणे हा केवळ जगाला दाखवण्याचा भाग आहे. प्रत्यक्षात बंद दरवाजाच्या मागे दोन्ही देशांचे खेळाडू एकमेकांशी संवाद साधतात आणि गप्पाही मारतात. मी वाचले आहे की, ड्रेसिंग रूम किंवा हॉटेलमध्ये त्यांच्यात सर्व काही सामान्य असते. मग मैदानावर ही औपचारिकता टाळणे हा केवळ एक दिखावा वाटतो.”
🚨 MASSIVE STATEMENT BY ALASTAIR COOK ON INDIA VS PAKISTAN HANDSHAKE 🚨 Alastair Cook said 🗣️ “The India-Pakistan handshake drama is mostly for public perception. Behind close doors, players joke together,share meals, do commentary and even shake hands like normal. Only to… pic.twitter.com/f8mUvZYJQv — Cricket Central (@CricketCentrl) February 20, 2026
या चर्चेत सहभागी असलेले माजी क्रिकेटपटू मायकल वॉन यांनी मात्र या घटनेवर खेद व्यक्त केला. क्रिकेटच्या मैदानात खिलाडूवृत्तीला महत्त्व असून अशा प्रकारे हस्तांदोलन टाळणे हे खेळासाठी दुर्दैवी असल्याचे वॉन यांनी नमूद केले.
भारत आणि पाकिस्तान क्रिकेटमधील ही ‘नो-हॅन्डशेक’ पॉलिसी गेल्या वर्षी दुबईत झालेल्या आशिया कप २०२५ पासून सुरू झाली. दोन्ही देशांमधील वाढता राजकीय तणाव आणि सीमावाद यामुळे भारतीय खेळाडूंना पाकिस्तानी खेळाडूंशी हस्तांदोलन न करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या, असे सांगण्यात येते.
एकीकडे बीसीसीआय (BCCI) आणि भारत सरकारची भूमिका स्पष्ट असताना, दुसरीकडे क्रिकेट चाहत्यांमध्ये यावर दोन गट पडले आहेत. काहींच्या मते सीमेवरील तणाव पाहता हे धोरण योग्य आहे, तर काहींना वाटते की खेळाला राजकारणापासून दूर ठेवले पाहिजे. एलिस्टर कुकच्या या दाव्यामुळे आता आंतरराष्ट्रीय स्तरावर या विषयावर नवीन वादाला तोंड फुटले असून, दोन्ही देशांच्या क्रिकेट बोर्डांकडून यावर कोणती प्रतिक्रिया येते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.