महिला प्रीमियर लीग 2024 हा सीजन एकदम थाटामाटात सुरु झाला आहे. या हंगामातील पहिल्या सामन्यांमध्ये मुंबई इंडियन्सने दिल्ली कपिटल्सचा सामन्यात पराभव केला. आता एमआयने गुजरात टायटन्सचा 5 गडी राखून पराभव केला आहे. मुंबईच्या संघाने सलग दुसरा सामने जिंकून गुणतालिकेत आपले पहिले स्थान आणखी मजबूत केले आहे. मुंबई इंडियन्स आणि गुजरात जायंट्सचा सामना पाहण्यासाठी स्टेडियममध्ये मोठ्या संख्येने चाहते आले होते. मात्र मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांना स्टेडियममध्ये त्यांच्या संघाचा झेंडा फडकावण्यास मनाई करण्यात आली, ज्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Here for the #WPL game between Gujarat Giants and Mumbai Indians and these volunteers are forcing to remove the Mumbai Indians Flag and Giving us threats.@BCCI @12thManArmyIN @WomensCricZone @imfemalecricket @MIPaltanFamily @allaboutcric_ @BCCIWomen @wplt20 @RealCricPoint pic.twitter.com/TqMKWpxsuv
— YaGunnersYa (@piyushnathani1) February 25, 2024
मुंबई इंडियन्सच्या एका चाहत्याने त्याच्या एक्स हँडल (पूर्वीचे ट्विटर) वर व्हिडिओ शेअर केला. ज्यामध्ये त्याने लिहिले की, स्टेडियमचे स्वयंसेवक मुंबई संघाचा झेंडा फडकवल्याबद्दल आम्हाला धमकावत आहे. त्याच ट्विटमध्ये स्टेडियमच्या स्वयंसेवकाचा व्हिडिओ शेअर केला होता. जिथे तो म्हणत आहे की, “तुम्ही व्हिडिओ रेकॉर्ड करू शकता. पण आज हे स्टेडियम गुजरात जायंट्ससाठी होम ग्राउंड आहे आणि त्यामुळे तुम्ही हा मुंबई इंडियन्सचा झेंडा फडकू शकत नाही. आणखी एका चाहत्याने एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये स्टेडियम स्वयंसेवक मुंबई इंडियन्सचे झेंडे काढून घेत आहे.
All the Mumbai Indians flags at the Chinnaswamy Stadium were taken away by the ground staff @mipaltan @gujarat_titans #shameOnChinnaswamy @BCCI @IPL @wplt20 pic.twitter.com/3jOLa6CfiC
— Parasa sujvil (@PSujvil) February 25, 2024
सामन्याबद्दल बोलयचे झाले तर, कर्णधार हरमनप्रीत कौरने आज पुन्हा एकदा मुंबईसाठी कर्णधारपदाची खेळी खेळली आहे. त्याने 41 चेंडूत 46 धावांची खेळी केली आहे. याशिवाय अमेलिया केरनेही कर्णधाराला चांगली साथ दिली. त्याने 25 चेंडूत 31 धावांची खेळी खेळली आहे. या दोन खेळाडूंच्या शानदार फलंदाजीमुळे मुंबई इंडियन्सने सामना सहज जिंकला.