What will Team India's squad be like for Asia Cup 2025? Who will be selected? Who will be out? Find out...
Team India squad for Asia Cup 2025 : आता क्रिकेटप्रेमींना आशिया कप २०२५ स्पर्धेचे वेध लागले आहे. या स्पर्धेला ९ सप्टेंबरपासून सुरवात होणार आहे. भारतीय संघ आणि त्यांचे क्रिकेट बोर्ड आशिया कप २०२५ च्या तयारीत मग्न असल्याची माहिती मिळत आहे. आशिया कपचे वेळापत्रक आधीच जाहीर करण्यात आले आहे. त्यात सहभागी होणाऱ्या संघा देखील आपल्या तयारीला लागले आहेत. टीम इंडियाचे काही खेळाडू इंग्लंड दौऱ्यानंतर विश्रांती घेत आहेत.
दरम्यान, आशिया कप २०२५ मध्ये टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हन आणि त्याच्या संघाबद्दल सर्वात मोठा प्रश्न निर्माण होत आहे. आशिया कपमध्ये अंतिम ११ आणि संघ कसा असणारा आहे? याबाबत अद्याप काही एक निश्चित झालेले नाही. टीम इंडियाचा संभाव्य संघ कसा असणार आहे, याबाबत आपण जाणून घेऊया.
हेही वाचा :Cincinnati Open 2025 मध्ये आर्यना सबालेन्काचा धुमाकूळ! एम्मा रॅडुकानूला पराभूत करत जिंकले विजेतेपद
यावेळीही आशिया कप २०२५ टी-२० स्वरूपात खेळवला जाणार आहे. सध्या सूर्यकुमार यादव टीम इंडियासाठी टी-२० मध्ये कर्णधारपदाची जबाबदारी सांभाळत आहे. अशा परिस्थितीत, तो आशिया कपमध्ये संघाची जबाबदारी स्वीकारेल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. टीम इंडियाचा कसोटी कर्णधार शुभमन गिल बऱ्याच काळानंतर टी-२० मध्ये परतण्याची शक्यता असून त्यानुसार, तो सलामीवीर म्हणून टीम इंडियासाठी एक चांगला पर्याय असू शकतो.
अभिषेक शर्मा आणि संजू सॅमसन यांनी टीम इंडियासाठी सलामीवीर म्हणून जबाबदारी सांभाळली आहे. अभिषेक शर्मा सध्या टी-२० मध्ये अव्वल फलंदाज आहे. त्यामुळेच तो टी-२० संघाचा भाग असणे जवळ्जवळ निश्चित समजले जात आहे. याशिवाय, संघाकडे यशस्वी जयस्वालचा एक उत्तम पर्याय देखील उपलब्ध आहे. आता आशिया कपमध्ये टीम इंडियासाठी कोण सलामीवीर म्हणून मैदानावर उतरेल हे पाहणं रंजक असणार आहे.
संजू सॅमसन देखील संघाचा भाग असण्याची शक्यताया आहे. तो यष्टिरक्षक म्हणून व्यवस्थापनाची पहिली पसंत असणार आहे. संघाकडे यष्टिरक्षकासाठी जितेश शर्मा आणि ध्रुव जुरेलचा देखील पर्याय असणार आहे. त्याच वेळी, हार्दिक पंड्या, तिलक वर्मा, शिवम दुबे, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर यांना देखील मधल्या फळीत समाविष्ट करण्यात येऊ शकते. तर दुसरीकडे, गोलंदाजी विभागात कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, हर्षित राणा आणि अर्शदीप सिंग गोलंदाजी करताना दिसण्याची शक्यता आहे. जसप्रीत बुमराह तंदुरुस्त असल्यास संघात टायचे स्थान निश्चित असणार आहे.
हेही वाचा : डेव्हिड वॉर्नरने मोडला विराट कोहलीचा मोठा विक्रम, T20 क्रिकेटमध्ये केला पराक्रम
सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुभमन गिल, यशस्वी जैस्वाल , टिलक वर्मा, अभिषेक शर्मा, संजू सॅमसन, शिवम दुबे, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह, हर्षित राणा, अर्शदीप सिंग, हार्दिक जश्न, शर्मा, जशप्रीत पंडित