आर्यना सबालेन्का(फोटो-सोशल मीडिया)
Cincinnati Open 2025 : स्टार टेनिसपटू आर्यना सबालेंका हिने सिनसिनाटी ओपन २०२५ मध्ये सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. सबालेंकाने ३ तास ९ मिनिटे चाललेल्या अटीतटीच्या सामन्यात ब्रिटनच्या एम्मा रॅडुकानूला पराभूत करून विजेतेपदावर नाव कोरले आहे. रॅडुकानूला पुन्हा एकदा सबालेंकाकडून पराभव चाखावा लागला. एकूणच, सबालेंका विरुद्धच्या सलग पराभवांची मालिका तिला आल्यावेळी देखील खंडित करता आली नाही.
राडुकानूने पहिल्या सेटमध्ये शानदार खेळाचे प्रदर्शन करून पहिले नऊ गुण जिंकून जोरदार सुरुवात केली. पण सामना जसजसा पुढे जात राहिला तसतसा तिचा खेळ खालावत गेला. तिची सर्व्हिस कमकुवत व्हायला लागली. त्याच वेळी, सुरुवातीला मागे पडल्यानंतर सबालेंकाने जोरदार मुसंडी मारत टाय-ब्रेकमध्ये पहिला सेट ७-६ (३) असा जिंकला.
एम्मा रॅडुकानूकडून दुसऱ्या सेटमध्ये जोरदार पुनरागमन बघायला मिळाले. तिने सबालेंकाला मागे टाकत सेट ४-६ असा आपल्या आणावे केला. तिसरा सेट खूप महत्त्वाचा आणि निर्णायक राहिला होता. दोघांनीही आपला सर्वोत्तम खेळ दाखवला. रादुकानुने शक्तिशाली फोरहँड आणि बॅकहँडचा वापर केला आणि साबालेंकाचा हल्ला परतवून लावण्यातही ती यशस्वी ठरली. त्याच वेळी, नंबर वन खेळाडू साबालेंकानेही तिच्या वर्गाने रादुकानुवर आपली पकड अधिक मजबूत केली आणि सेट टायब्रेकरमध्ये ७-६ (५) असा विजय मिळवून विजेतेपदावर आपले नाव कोरले.
सिनसिनाटी ओपन २०२५ स्पर्धेचे विजेतेपद जिंकल्यावर साबालेंका म्हणाली की, “मला हा अटीतटीचा सामना जिंकल्याबद्दल खूप आनंद आहे. रादुकानुवर तिसरा सेट जिंकण्यासाठी मला धोकादायक शॉट्सचा वापर करावा लागाल. मला तिच्याविरुद्ध लढण्याचा आनंद मिळत आहे. ती एक अद्भुत अशी खेळाडू तसेच खूप चांगली व्यक्ती आहे. मी तिच्यासाठी खूप आनंदी आहे. तिला मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या निरोगी पाहून मला अधिक आनंद होत आहे. ती खेळात सतत सुधारणा करत असते.”
हेही वाचा : DPL 2025 : सामन्यादरम्यान हर्षित राणासह या 3 खेळाडूंवर ठोठावण्यात आला दंड! प्लेयर्सची चुक पडली महागात
एम्मा रादुकानुला हा सामना जिंकता आला नाही, परंतु तिने तिच्या खेळाने सर्वांना प्रभावित केले आहे. अंतिम सामन्यात पराभव झाल्यानंतर रादुकानुने प्रतिक्रिया देताना म्हटले की, “ती एका कारणास्तव नंबर १ आहे. विम्बल्डनपेक्षा देखील मी तिच्यावर जास्त दबाव टाकला होता. ती माझ्यासाठी समाधानकारक बाब होती. मला नेहमीच वाटायचे की गवत हे माझ्यासाठी अधिक योग्य आहे. मी अजून देखील असेच मानते. म्हणून हार्ड कोर्टवर तिच्यावर दबाव टाकण्याचा मला खूप अभिमान वाटत आहे.