फोटो सौजन्य – X (TNPL)
तमिळनाडू प्रीमियर लीग सध्या सुरू आहे, यामध्ये कालचा सामना हा दिंडीगुल ड्रॅगन विरुद्ध सालेम स्पार्टन्स या दोन संघांमध्ये सामना सुरू होता. या सामन्यांमध्ये भारताचा फिरकी गोलंदाज आर अश्विन आणि टीम इंडियाचा मिस्ट्री स्पिनर वरून चक्रवर्ती याने कहर केला. या सामन्यांमध्ये क्रिकेटचा चाहत्यांना कधीही न पाहिलेले दृश्य पाहायला मिळाले. पण नक्की असे काय झाले ज्यामुळे सर्वच चकित आहेत. आर अश्विन याला म्हटले जात आहे तर वरून चक्रवर्ती याला धोनीची पदवी दिली जात आहे. यासंदर्भात आम्ही तुम्हाला सविस्तर माहिती देणार आहोत.
आर अश्विन आणि वरून चक्रवर्ती हे दोन्ही खेळाडू सामन्यात डिंडीगुल ड्रॅगन्स संघाचा भाग होते. अश्विन संघाचा कर्णधार देखील आहे. TNPL 2025 मध्ये, सालेम स्पार्टन्स आणि दिंडीगुल ड्रॅगन्स २२ जून रोजी एकमेकांसमोर आले. या सामन्यात सालेम स्पार्टन्सने प्रथम फलंदाजी करत २० षटकांत ७ गडी बाद १८७ धावा केल्या. सालेमकडून निधीश राजगोपालने सर्वाधिक ७४ धावा केल्या. दुसरीकडे, दिंडीगुल ड्रॅगन्सकडून सर्वात प्रभावी गोलंदाज त्याचा कर्णधार आर. अश्विन होता, ज्याने ४ षटकांत २३ धावा देत ३ गडी बाद केले.
आता डिंडीगुल ड्रॅगन्ससमोर १८८ धावांचे लक्ष्य होते. अशा परिस्थितीत नेहमीप्रमाणे कर्णधार अश्विन ओपनिंगला आला. अश्विनने फलंदाजीसाठी येताच धुमाकुळ घालायला सुरुवात केली, ज्यामुळे असे वाटले की त्याने चेंडूने जे केले ते त्याचे अर्धे काम होते. तो आता उर्वरित अर्धे काम पूर्ण करत होता.
Varun Chakravarthy delivered a humdinger finish for the Dindigul Dragons! @TNCACricket @DindigulDragons @chakaravarthy29 #TNPL #NammaOoruNammaGethu #TNPL2025 pic.twitter.com/pPXQlWzuJl
— TNPL (@TNPremierLeague) June 22, 2025
डावाची सुरुवात करताना, अश्विनने सलेम स्पार्टन्सविरुद्ध अशा प्रकारे खेळ केला की जणू काही तो त्याच्या बॅटमधून नाही तर वीरेंद्र सेहवाग त्याच्या बॅटमधून आग ओकत होता. अश्विनने २५७ पेक्षा जास्त स्ट्राईक रेटने खेळताना फक्त १४ चेंडूत ३६ धावा केल्या आणि त्या संघासाठी फायदेशीर ठरल्या. अश्विनच्या खेळीत ५ चौकार आणि २ षटकारांचा समावेश होता. बाद होण्यापूर्वी त्याने त्याचा सलामीचा साथीदार शिवम सिंगसोबत ५७ धावांची जलद भागीदारी केली.
टशनबाजी सुरू… ENG vs IND सामन्यादरम्यान सिराज आणि ब्रूक मैदानावर भिडले! पहा Viral Video
आता अश्विनने तो पाया रचला होता ज्यावर संघाला विजयाची उंच इमारत बांधायची होती. डिंडीगुल ड्रॅगन्स यात यशस्वी होताना दिसत होते. तथापि, शेवटी सामना अडकला. डिंडीगुल ड्रॅगन्सला जिंकण्यासाठी शेवटच्या २ चेंडूत ७ धावांची आवश्यकता होती. अशा परिस्थितीत, त्या रोमांचक वातावरणाचे गांभीर्य समजून, क्रीजवर उभ्या असलेल्या वरुण चक्रवर्तीने लगेचच धोनीचा फॉर्म घेत सामना संपवला. त्याने शेवटच्या २ चेंडूंवर एक षटकार आणि एक चौकार मारला आणि धोनीच्या शैलीत संघाला विजय मिळवून दिला.