Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

IPL 2025 Retention : आयपीएल २०२५ चे रिटेन्शन कधी, कुठे लाइव्ह विनामूल्य पाहायचे? वाचा सविस्तर माहिती

क्रिकेट चाहत्यांना जाणून घ्यायचे आहे की त्यांची फ्रेंचायझी कोणते खेळाडू कायम ठेवेल. काही खेळाडूंची नावे जवळपास निश्चित झाली असली तरी काही मोठ्या नावांवर सस्पेन्स आहे.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Oct 29, 2024 | 12:04 PM
फोटो सौजन्य - सोशल मीडिया

फोटो सौजन्य - सोशल मीडिया

Follow Us
Close
Follow Us:

आयपीएल 2025 रिटेन्शन : इंडियन प्रीमियर लीग २०२५ च्या मेगा ऑक्शनच्या चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरु आहेत. यामध्ये आता कोणता संघ खेळाडूंना कायम ठेवणार आणि कोणत्या खेळाडूंना रिटेन करणार यावर आता मोठ्या प्रमाणात प्रश्न उपस्थित केले जात आहेत. आयपीएल 2025 रिटेन्शनबाबत जवळपास सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्या आहेत. सर्व फ्रँचायझी 31 नोव्हेंबरपर्यंत बीसीसीआयला त्यांच्या कायम ठेवण्याच्या याद्या सादर करतील. त्यानंतर मेगा लिलावात कोणती मोठी नावे सहभागी होणार आहेत, हे चित्र स्पष्ट होईल. या मेगा लिलावावर क्रिकेट चाहत्यांच्या नजरा खिळल्या आहेत. चाहत्यांना जाणून घ्यायचे आहे की त्यांची फ्रेंचायझी कोणते खेळाडू कायम ठेवेल. काही खेळाडूंची नावे जवळपास निश्चित झाली असली तरी काही मोठ्या नावांवर सस्पेन्स आहे.

आयपीएल २०२५ च्या ऑक्शनच्या संदर्भात अनेक चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरु आहेत. त्यामुळे क्रिकेटप्रेमी आगामी आयपीएल २०२५ च्या ऑक्शन साठी प्रचंड उत्सुक आहेत. लवकरच आयपीएल २०२५ च्या ऑक्शनचे ठिकाण आणि तारीख बीसीसीआय जाहीर करणार आहे.

कुठे पाहू शकता रिटेन्शन लाईव्ह स्ट्रीमिंग विनामूल्य?

बीसीसीआय राखीव यादी सादर करण्याची तारीख ३१ नोव्हेंबर ठेवण्यात आली आहे. रिटेंशनचे लाइव्ह स्ट्रीमिंग हॉटस्टार किंवा सोनीवर दिसणार नाही, तर त्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग JioCinema वर असेल. जिथे तुम्हाला संपूर्ण माहिती मोफत मिळू शकते. आयपीएल २०२५ च्या रिटेन्शनची लाइव्ह स्ट्रिमिंग दुपारी 4:30 वाजल्यापासून सुरू होईल.

🚨 IPL RETENTION SHOW FROM 4.30PM ON 31ST OCTOBER. 🚨 pic.twitter.com/hAz2CVB17L — Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) October 26, 2024

आयपीएल 2025 च्या मेगा लिलावापूर्वी, अनेक मोठ्या खेळाडूंबद्दल मीडिया रिपोर्ट्स येत आहेत की ते खेळाडू यावेळी सोडले जाऊ शकतात. यामध्ये अनेक मोठ्या भारतीय संघामधील त्याचबरोबर मुंबई इंडियन्स चेन्नई सुपर किंग्स सारख्या दिग्गज संघ ज्यांनी आयपीएलचे पाच जेतेपद नावावर केले आहेत. त्या संघामध्ये अनेक मोठे उलटफेर पाहायला मिळू शकतात. ज्यामध्ये दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार ऋषभ पंत, केकेआरचा कर्णधार श्रेयस अय्यर आणि आरसीबीचा कर्णधार फाफ डू प्लेसिस यासारख्या मोठ्या नावांचा समावेश आहे. आता हे खेळाडू यावेळच्या मेगा लिलावात खरोखरच सहभागी होणार का हे पाहायचे आहे.

मेगा लिलावापूर्वी, प्रत्येक संघ 6-6 खेळाडूंना कायम ठेवू शकतो. ज्यामध्ये संघ राईट टू मॅच कार्ड देखील वापरू शकतो. RTM 5 पर्यंत कॅप्ड खेळाडू दर्शवू शकतात. याशिवाय आयपीएलमध्ये पहिल्यांदाच नवीन सुरुवात होत आहे. ज्यामध्ये सामना खेळणाऱ्या प्रत्येक खेळाडूला 7.5 लाख रुपये फी दिली जाईल.

BIG UPDATES FOR IPL RETENTIONS (Sports Tak): – 5 Retention & 1 RTM.
– No cap on Indians and overseas.
– Teams will pay 75cr if they wish to retain all 5.
– Total purse is 120cr.
– Teams can adjust Retention and RTM as per their wish (1+5RTM or 2+4RTM).
A BIG WAR INCOMING. ⚠️ pic.twitter.com/2cYhkAQdPA — Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) September 28, 2024

Web Title: When where to watch ipl 2025 retention live free read detailed information

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 29, 2024 | 12:04 PM

Topics:  

  • cricket
  • IPL 2025
  • ipl auction

संबंधित बातम्या

IND vs WI highlight : भारताच्या संघाने वेस्ट इंडिजला चारली धूळ! WI चा पहिल्या सामन्यात 140 धावांनी केला पराभव
1

IND vs WI highlight : भारताच्या संघाने वेस्ट इंडिजला चारली धूळ! WI चा पहिल्या सामन्यात 140 धावांनी केला पराभव

IND vs WI : फ्लाईंग नितीश कुमार रेड्डी… हवेत उडून घेतला झेल तुम्ही पाहिला का हा Video?
2

IND vs WI : फ्लाईंग नितीश कुमार रेड्डी… हवेत उडून घेतला झेल तुम्ही पाहिला का हा Video?

IND vs WI 3rd Day : दुसऱ्या इनिंगमध्ये वेस्टइंडीजचा अर्धा संघ पॅव्हेलियनमध्ये! जडेजाने तीन फलंदाजांना दाखवला बाहेरचा रस्ता
3

IND vs WI 3rd Day : दुसऱ्या इनिंगमध्ये वेस्टइंडीजचा अर्धा संघ पॅव्हेलियनमध्ये! जडेजाने तीन फलंदाजांना दाखवला बाहेरचा रस्ता

India Squad Announcement : आज होणार ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिकेसाठी घोषणा! रोहित-विराटचे पुनरागमन जवळजवळ निश्चित
4

India Squad Announcement : आज होणार ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिकेसाठी घोषणा! रोहित-विराटचे पुनरागमन जवळजवळ निश्चित

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.