
फोटो सौजन्य - BCCI सोशल मीडिया
भारत विरुद्ध न्यूझीलंड : भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यामध्ये तीन सामान्यांची कसोटी मालिका झाली यामध्ये भारताच्या संघाला पराभवाचा सामना करावा लागला. आता यानंतर टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेच्या विरुद्ध मालिका खेळणार आहे आणि त्यानंतर भारताचा संघ रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली बॉर्डर गावस्कर ट्रॉफी खेळणार आहे. यासाठी टीम इंडियाची १८ खेळाडूंचा संघ घोषित करण्यात आला आहे. यामध्ये अनेक नवे चेहरे बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमध्ये पाहायला मिळणार आहेत. बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळली जाणार आहे. यावेळी बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी ऑस्ट्रेलियन भूमीवर होणार असून, ते टीम इंडियासाठी मोठे आव्हान असणार आहे. मालिकेतील पहिला सामना 22 नोव्हेंबरपासून खेळवला जाणार आहे, मात्र आता प्रश्न उपस्थित होत आहे की टीम इंडिया या मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाला कधी रवाना होणार? त्यामुळे त्याची तारीख निघाली आहे.
भारताच्या संघाने न्यूझीलंडविरुद्ध केलेल्या कामगिरीमुळे सोशल मीडियावर टीम इंडियाला प्रचंड ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. भारताच्या संघाच्या कामगिरीवर आता मोठ्या प्रमाणात प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
हेदेखील वाचा – भारताचा संघ दक्षिण आफ्रिकेत दाखल! विमानतळावर झाली खेळाडूंची जनरल नॉलेज टेस्ट
स्पोर्टस्टारच्या रिपोर्टनुसार, टीम इंडिया 10 किंवा 11 नोव्हेंबरला बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीसाठी रवाना होणार आहे. मात्र, टीम इंडिया ऑस्ट्रेलियाला रवाना होण्याच्या तारखेची अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही.
लवकर जाणे टीम इंडियासाठी फायदेशीर ठरेल. तेथे गेल्यानंतर खेळाडू ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर सराव करतील, जेणेकरून तेथील परिस्थितीनुसार खेळाडूंना स्वत:ला जुळवून घेता येईल. भारतीय संघाने नुकतीच घरच्या भूमीवर न्यूझीलंडविरुद्ध तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळली. घरच्या मालिकेत टीम इंडियाला 0-3 ने व्हाईट वॉशला सामोरे जावे लागले होते, त्यानंतर बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी टीम इंडियासाठी मोठे आव्हान ठरू शकते. अशा स्थितीत बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये टीम इंडिया ऑस्ट्रेलियाविरुद्ध कशी कामगिरी करते हे पाहणे रंजक ठरणार आहे.
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया पहिली कसोटी – २२ ते २६ नोव्हेंबर – पर्थ स्टेडियम, पर्थ
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया दुसरी कसोटी – 06 ते 19 डिसेंबर – ॲडलेड ओव्हल, ॲडलेड
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया तिसरी कसोटी – १४ ते १८ डिसेंबर – द गाबा, ब्रिस्बेन.
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया चौथी कसोटी – २६ ते ३० डिसेंबर – मेलबर्न क्रिकेट ग्राउंड, मेलबर्न
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया पाचवी कसोटी – ०३ ते ०७ जानेवारी – सिडनी क्रिकेट ग्राउंड, सिडनी.
रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, अभिमन्यू ईश्वरन, शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), सरफराज खान, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), आर अश्विन, आर जडेजा, आर. मोहम्मद सिराज, आकाश दीप, प्रसिध कृष्णा, हर्षित राणा, नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर.
राखीव खेळाडू – मुकेश कुमार, नवदीप सैनी, खलील अहमद.