फोटो सौजन्य - BCCI सोशल मीडिया
भारताचा T२० संघ : भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये होणाऱ्या T२० मालिकेसाठी फक्त चार दिवस शिल्लक आहेत. भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये चार सामान्यांची मालिका आयोजित करण्यात आली आहे. यासाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणाऱ्या T२० मालिकेत सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली खेळणार आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील T20 मालिका ८ नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. त्याचा पहिला सामना डर्बनमध्ये होणार आहे. या मालिकेसाठी टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेत पोहोचली आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने खेळाडूंचा एक मनोरंजक व्हिडिओ शेअर केला आहे . टीम इंडियाच्या खेळाडूंची विमानतळावरच सामान्य चाचणी झाली. विशेष म्हणजे हे प्रश्न सहकारी खेळाडूंनीच विचारले.
हेदेखील वाचा – KL Rahul : राहुलचा फ्लॉप शो! बॉर्डर गावस्कर ट्रॉफी आधी केएल खेळणार ही स्पर्धा
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने त्याच्या X अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. टीम इंडियाच्या दक्षिण आफ्रिकेला जाताना प्रवासाचा हा व्हिडिओ आहे. यामध्ये खेळाडूंची मजाही पाहायला मिळत आहे. अभिषेक शर्माने टिळक वर्मा यांच्यासह इतर सहकारी खेळाडूंची सामान्य ज्ञान चाचणी घेताना दिसत आहेत. विशेष म्हणजे त्यांनी टिळकांसह सर्व खेळाडूंना फक्त दक्षिण आफ्रिकेशी संबंधित प्रश्न विचारले. अर्शदीप सिंग यांनाही प्रश्न विचारण्यात आले. यावेळी अक्षर पटेलने सुद्धा अर्षदिपला प्रश्न विचारताना दिसले आहेत. व्हिडिओमध्ये कॅप्टन सूर्यकुमार यादव मस्ती करताना दिसत होते.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या T20 मालिकेसाठी टीम इंडियाने अनुभवी खेळाडूंसोबतच युवा खेळाडूंनाही संधी दिली आहे. सूर्याच्या नेतृत्वाखालील संघात अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, रिंकू सिंग, रमणदीप सिंग आणि अक्षर पटेल यांना स्थान मिळाले आहे. हार्दिक पांड्याही संघाचा एक भाग आहे. जितेश कुमार आणि संजू सॅमसनलाही संधी मिळाली आहे. आवेश खान, यश दयाल, वरुण चक्रवर्ती आणि रवी बिश्नोई हे देखील संघात आहेत.
हेदेखील वाचा –IND VS NZ : हुश्श…भारतात येऊन न्यूझीलंडने बदलला इतिहास! मालिकेत टीम इंडियाला 3-0 केलं पराभूत
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात चार सामन्यांची T20 मालिका होणार आहे. मालिकेतील पहिला सामना ८ नोव्हेंबरला डर्बनमध्ये खेळवला जाईल. दुसरा सामना 10 नोव्हेंबरला होणार आहे. तिसरा सामना 13 नोव्हेंबरला तर चौथा सामना 15 नोव्हेंबरला खेळवला जाईल. हा सामना जोहान्सबर्ग येथे होणार आहे.
सूर्यकुमार यादव (कर्णधार), अभिषेक शर्मा, संजू सॅमसन, रिंकू सिंह, टिळक वर्मा, जितेश शर्मा, हार्दिक पांड्या, रमणदीप सिंह, अक्षर पटेल, वरून चक्रवर्ती, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंह, विशक विजय कुमार, आवेश खान, यश दयाल