फोटो सौजन्य - IndianPremierLeague
Sunil Gavaskar Video : २५ एप्रिल रोजी आयपीएल 2025 चा ४२ वा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) विरुद्ध राजस्थान रॉयल्स (RR) यांच्यात पार पडला. तर उद्या म्हणजेच २५ एप्रिल रोजी चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद यांच्यामध्ये सामना खेळवला जाणार आहे. हा सामना चेन्नईमधील चेपॉक स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. इंडियन प्रीमियर लीगच्या सोशल मिडिया अकाउंटवर एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. यामध्ये भारताचे मास्टर ब्लास्टर सुनील गावस्कर हे बीसीसीआयने लॉन्च केलेले रोबोटिक प्राणी चंपक सोबत मस्ती करताना दिसत आहेत. सध्या रोबोट आणि सुनील गावस्कर या दोघांचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
आयपीएलच्या सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये सुनील गावस्कर ज्याप्रकारे हातवारे करत आहेत त्याचप्रकारे रोबोटिक प्राणी त्यांना करून दाखवत आहे. सुनील गावस्कर हे व्हिडिओमध्ये मागे पुढे करत आहे ते रोबोट देखील तसेच त्यांना करून देत आहे. एवढेच नव्हे तर गावस्कर यांना रोबोट उद्या देखील मारून दाखवत होते त्याचबरोबर त्यांना टाळी देखील देत होते. जेव्हा ते मैदान सोडते होते तेव्हा त्यांचा पाठलाग करताना दिसत आहे. आयपीएलच्या X वर शेअर केलेला व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Looks like Sunny G found a new friend 😊 #TATAIPL | #RCBvRR pic.twitter.com/VPX7CU2ZMb
— IndianPremierLeague (@IPL) April 24, 2025
सुनील गावस्कर आणि रोबोट यांचा व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये एका नेटकऱ्याने लिहिले आहे की, स्पर्धेतील मनोरंजनकर्ता. तर दुसऱ्याने लिहिले आहे की, सुनीला गावस्कर त्यांच्या वयाच्या मानाने खूपच तंदुरुस्त आणि निरोगी आहेत हे मला नक्कीच आवडले. आणखी एक कॉमेंट अली आहे यामध्ये लिहिले आहे की, सनी पाजीचा नवा मित्र. अशा अनेक कॉमेंट्स नेटकऱ्यांच्या आल्या आहेत आणि सोशल मीडियावर रोबोटचे मोठ्या प्रमाणात कौतुक केले जात आहे.
चेपॉकच्या मैदानावर उद्या म्हणजेच २५ एप्रिल रोजी चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद यांच्यामध्ये सामना होणार आहे. चेपॉकने आतापर्यंत एकूण ८९ आयपीएल सामने आयोजित केले आहेत. यापैकी ५१ सामन्यांमध्ये प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने विजय मिळवला आहे. त्याच वेळी, धावांचा पाठलाग करणाऱ्या संघाने ३८ सामन्यांमध्ये मैदानात उतरले आहे. चेपॉक येथे पहिल्या डावातील सरासरी धावसंख्या १६३ धावा आहे. या मैदानावर सर्वाधिक धावसंख्या २०१० मध्ये चेन्नई सुपर किंग्जने केली होती. राजस्थान रॉयल्सविरुद्ध खेळताना, सीएसकेने ५ विकेट्स गमावल्यानंतर २४६ धावा केल्या होत्या. चेपॉक येथे सर्वाधिक लक्ष्याचा यशस्वीपणे पाठलाग करण्याचा विक्रम पंजाबच्या नावावर आहे. पंजाबने सीएसकेविरुद्ध २०१ धावांचे लक्ष्य सहज गाठले होते.