फोटो सौजन्य - IndianPremierLeague
RCB vs RR first innings report : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या घरच्या मैदानावर आज राजस्थान रॉयल्सविरुद्ध सामना सुरु आहे. या सीझनमध्ये बंगळुरूच्या संघाने त्यांचे पाचही सामने बाहेर झालेल्या मैदानावर जिंकले आहेत. पण घरच्या मैदानावर रजत पाटीदार टोळीने एकही सामना जिंकलेला नाही. आजच्या सामन्यात राजस्थान रॉयल्सचा कर्णधार रियान परागने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. बंगळुरूच्या संघानं पहिले फलंदाजी करत राजस्थान रॉयल्ससमोर या सामन्यात २०६ धावांचे लक्ष्य उभे केले आहे. आजच्या सामन्यात दोन्ही संघाच्या खेळाडूंनी कशी कामगिरी केली यावर एकदा नजर टाका.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या कामगिरीबद्दल सांगायचे झाले तर संघाचा स्टार फलंदाज विराट कोहलीने अर्धशतक झळकवले आणि मोठी खेळी खेळली. विराट कोहलीने आजच्या सामन्यात ४२ चेंडूंमध्ये ७० धावा केल्या. यामध्ये त्याने २ षटकार ८ चौकार मारले. फिल्ल सॉल्ट आज मोठी खेळी खेळू शकला नाही. त्याने आज २३ चेंडूंमध्ये २६ धावा केल्या. बंगळुरूचा फलंदाज देवदत्त पडीक्कल सध्या दमदार फॉर्ममध्ये आहे. आज पदिक्कल याने देखील संघासाठी कमालीची फलंदाजी केली आणि आज त्याने त्याच्या होम ग्राउंडवर अर्धशतक झळकावले. देवदत्त पडीक्कलने आज संघासाठी २७ चेंडूंमध्ये ५० धावा केल्या आणि संदीप शर्मा याने त्याला बाहेरचा रस्ता दाखवला.
आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा कर्णधार रजत पाटीदार आजच्या सामन्यात विशेष कामगिरी करू शकला नाही. रजत पाटीदारने ३ चेंडू खेळले आणि त्याला संदीप शर्माने बाहेरचा रस्ता दाखवला. आज टीम डेव्हिडला लवकर संघाने फलंदाजीसाठी पाठवले होते. त्याने संघासाठी १५ चेंडूंमध्ये २३ धावा केल्या. यामध्ये त्याने २ चौकार मारले. रजत पाटीदारचा विकेट गेल्यानतंर जितेश शर्मा फलंदाजीला आला होता. त्याने १० चेंडूंमध्ये २० धावा केल्या.
राजस्थानच्या गोलंदाजीचे सांगायचे संघाच्या हाती फक्त ३ विकेट घेतले. यामध्ये संदीप शर्माच्या हाती २ विकेट लागला आहे. यामध्ये त्याने देवदत्त पदिक्कल आणि बंगळुरूचा कर्णधार रजत पाटीदार यांना बाहेरचा रस्ता दाखवला. तर विराट कोहलीचा विकेट जोफ्रा आर्चरने घेतला. वानिंदू हसरंगा याने देखील संघासाठी एक विकेट घेतला.