फोटो सौजन्य - इंस्टाग्राम
एमएस धोनी व्हायरल व्हिडिओ : भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावामुळे ९ मे पासून आयपीएल एका आठवड्यासाठी स्थगित करण्याची घोषणा बीसीसीआयने केली होती. बीसीसीआयने दिल्ली आणि पंजाब या दोन्ही संघामधील खेळाडूंना आणि स्टाफला देखील वंदे भारतने घरी पोहोचवले. आयपीएल स्थगित झाल्यानंतर, खेळाडू आपापल्या घरी जाऊ लागले. अजुनपर्यत इंडियन प्रीमियर लीगचे वेगळापत्रक बीसीसीआयने जाहीर केले आहे. त्यामुळे सामने कधी सुरु होणार यासंदर्भात कोणतीही अधिकृत माहिती बीसीसीआयने शेअर केली नाही. चेन्नईचा कर्णधार एमएस धोनी सोशल मीडियावर सक्रिय नसतो पण आता सध्या त्याचा सोशल मीडियावर एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे.
एमएस धोनीचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता ज्यामध्ये तो विमानात दिसत होता. व्हिडिओमध्ये धोनीने एक खास संदेश लिहिलेला टी-शर्ट घातला होता. शनिवारी, १० मे रोजी इंस्टाग्रामवर एका धोनीच्या चाहत्याने विमानाच्या आतून एक व्हिडिओ शेअर केला. या व्हिडिओमध्ये सीएसकेचा कर्णधार एमएस धोनी दिसत आहे. व्हिडिओमध्ये लिहिले आहे, ‘थला रांची येथील त्याच्या घरी जात आहे.’ त्याच वेळी, व्हिडिओमध्ये धोनीने काळ्या रंगाचा टी-शर्ट घातल्याचे दिसत आहे.
या टी-शर्टवर पांढऱ्या रंगात ‘कर्तव्य, सन्मान आणि देश’ असे लिहिले आहे. धोनी हा टेरिटोरियल आर्मीमध्ये लेफ्टनंट कर्नल आहे. हे एक सन्माननीय पद आहे. तथापि, धोनीने लष्करी प्रशिक्षण घेतले आहे. धोनीने टी-शर्टद्वारे देशसेवेबद्दलचे प्रेम व्यक्त केले.
आयपीएल स्थगित होण्यापूर्वी चेन्नई सुपर किंग्जने कोलकाता नाईट रायडर्सचा दोन विकेट्सने पराभव केला होता. चेन्नई सुपर किंग्ज हा चालू हंगामातील प्लेऑफमधून बाहेर पडलेला पहिला संघ ठरला. चेन्नईला १२ पैकी फक्त ३ सामने जिंकता आले आहेत. ते पॉइंट टेबलमध्ये १० व्या स्थानावर आहे. हे लक्षात घेण्यासारखे आहे की भारत आणि पाकिस्तानमधील युद्धबंदीमुळे आयपीएल पुन्हा सुरू होण्याची आशा आहे. बीसीसीआयने फ्रँचायझींना १३ मे पर्यंत खेळाडू एकत्र करण्यास सांगितले आहे. वृत्तानुसार, बीसीसीआय लवकरच नवीन वेळापत्रक जाहीर करू शकते. १६ मे पासून आयपीएल पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे.
चेन्नई सुपर किंग्सचे अजून दोन सामने शिल्लक आहेत. यामध्ये एक सामना त्यांचा राजस्थान रॉयल्सशी होणार आहे तर गुजरात टायटन्सशी शेवटचा सामना सुरु होणार आहे. ऋतुराज गाईकवाडकडे चेन्नई सुपर किंग्सचे कर्णधारपद होते पण तो या सीझनमध्ये झालेल्या दुखापतीमुळे स्पर्धेबाहेर झाला. त्याच्या जागेवर चेन्नईच्या संघाने आयुष म्हात्रेला संघामध्ये घेतले आहे. ऋतुराज गाईकवाड हा स्पर्धेतून बाहेर झाल्यानंतर धोनीने संघाचे कर्णधारपद सांभाळले.