Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

चॅम्पियन ट्रॉफीचा वाद पेटला! आज होणार निर्णय, टीम इंडिया पाकिस्तानला जाणार की नाही?

भारतच क्रिकेट संघ पाकिस्तानला जाणार की नाही याचा निर्णय लवकरच होणार आहे. यासाठी बीसीसीआय लवकरच या स्पर्धेबाबत ठोस निर्णय घेऊ शकते. त्याचबरोबर बीसीसीआयने सुद्धा आयसीसीला पत्र पाठवले होते. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष मोहसीन नक्वी लवकरच भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे सचिव जय शाह यांची भेट घेऊ शकतात. हे दोघेही आयसीसीच्या एजीएमसाठी श्रीलंकेत असणार आहेत.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Jul 22, 2024 | 08:58 AM
फोटो सौजन्य - BCCI

फोटो सौजन्य - BCCI

Follow Us
Close
Follow Us:

चॅम्पियन ट्रॉफी : भारताचा संघ चॅम्पियन ट्रॉफीसाठी (Champion Trophy 2025) पाकिस्तानमध्ये जाणार की नाही याची चर्चा आता वाढत चालली आहे. भारतीय खेळाडूंकडून त्याचबरोबर पाकिस्तानी प्लेयर्सकडून एकमेकांच्या विरोधात वक्तव्य केली जात आहेत. परंतु भारताचा संघ पाकिस्तानमध्ये जाणार आहे की नाही याची अजुनपर्यत कोणतीही अधिकृत माहिती बीसीसीआयने किंवा आयसीसीने दिली नाही. टीम इंडिया पाकिस्तनला जाणार की नाही हा वाद आता चिघळत चालला आहे. परंतु आता या अडचणींवर मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष मोहसीन नक्वी लवकरच भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (BCCI) सचिव जय शाह (Jay Shah) यांची भेट घेऊ शकतात. हे दोघेही आयसीसीच्या एजीएमसाठी श्रीलंकेत असणार आहेत.

पीसीबीने चॅम्पियन ट्रॉफीचे वेळापत्रक आयसीसीकडे पाठवले आहे. यामध्ये भारताच्या संघाचे सर्व सामने लाहोरमध्ये आयोजित करण्यात आले आहे. तर २ दिवसाआधी आयसीसीची बैठक पार पडली यामध्ये अनेक मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली आहे. परंतु अजुनपर्यत चॅम्पियन्स ट्रॉफीबाबत कोणताही कठोर निर्णय घेण्यात आलेला नाही. ही स्पर्धा हायब्रीड मॉडेलनुसार होणार की नाही याबाबत लवकरच निर्णय घेतला जाणार आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीबाबत आतापर्यंत दोन्ही देशांकडून अनेक विधाने समोर आली आहेत.

भारताचा संघ आशिया कपसाठी पाकिस्तनमध्ये गेली नव्हती, तेव्हा आशिया कपची स्पर्धा हायब्रीड मॉडेलप्रमाणे खेळवण्यात आली होती. त्यावेळी ते सामने श्रीलंका आणि दुबईमध्ये आयोजित करण्यात आले होते. आता पुन्हा एकदा या मॉडेलसह आयसीसी स्पर्धा होऊ शकते. बीसीसीआय लवकरच या स्पर्धेबाबत ठोस निर्णय घेऊ शकते. त्याचबरोबर बीसीसीआयने सुद्धा आयसीसीला पत्र पाठवले होते.

भारताचा संघ श्रीलंका दौऱ्यासाठी २७ जुलैपासून जाणार आहे. यासाठी भारताचा नवा प्रशिक्षक गौतम गंभीर आणि तीन इंडियाचा नवा स्टाफ असणार आहे. त्याचबरोबर टीम इंडियाचा श्रीलंका दौऱ्यासाठी T२० मालिकेसाठी सूर्यकुमार यादव कर्णधार असणार आहे. तर एकदिवसीय मालिकेसाठी रोहित शर्माचं कर्णधार असणार आहे.

Web Title: Whether team india will go to pakistan for champions trophy or not

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 22, 2024 | 08:52 AM

Topics:  

  • bcci
  • India vs Pakistan
  • indian cricket team

संबंधित बातम्या

Photo : KL Rahul ने झळकावले 11 वे कसोटी शतक, नऊ वर्षांनंतर घरच्या मैदानावर पहिलेच शतक
1

Photo : KL Rahul ने झळकावले 11 वे कसोटी शतक, नऊ वर्षांनंतर घरच्या मैदानावर पहिलेच शतक

IND A vs AUS A : भारतीय अ संघाचे लक्ष्य असेल एकदिवसीय मालिकेवर! अभिषेक, तिलक, अर्शदीप आणि हर्षित यांचा संघात समावेश
2

IND A vs AUS A : भारतीय अ संघाचे लक्ष्य असेल एकदिवसीय मालिकेवर! अभिषेक, तिलक, अर्शदीप आणि हर्षित यांचा संघात समावेश

BCCI हटवू शकते Mohsin Naqvi यांना पदावरुन, या नियमामुळे पीसीबी अध्यक्षांचा माज उतरणार?
3

BCCI हटवू शकते Mohsin Naqvi यांना पदावरुन, या नियमामुळे पीसीबी अध्यक्षांचा माज उतरणार?

मोहसीन नक्वी यांचा माफीनामा! भयभीत होत BCCI ची मागितली आगाऊ माफी; वाचा सविस्तर 
4

मोहसीन नक्वी यांचा माफीनामा! भयभीत होत BCCI ची मागितली आगाऊ माफी; वाचा सविस्तर 

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.