Rinku Singh’s total assets are Rs 9 crore : रिंकू सिंगला आता वेगळी ओळख करून देण्याची गरज नाही. त्याने आपल्या फलदांजीच्या शैलीने साऱ्या क्रीडा जगताला आपली स्वतःची ओळख करून दिली आहे. भारताचा हा उदयोन्मुख क्रिकेटपटू सद्या त्याच्या खाजगी आयुष्यामुळे चांगलाच चर्चेत आला आहे. रिंकू सिंगने अलिकडेच खासदार प्रिया सरोजशी साखरपूडा केला आहे. लवकरच ते लग्न करणार आहेत. त्यानंतर रिंकू सिंग नेमकं किती कमाई करतो आणि त्याच्या कामाईचे मार्ग कोणकोणते आहेत. याबाबत चाहत्यांना प्रश्न पडू लागले आहेत.
रिंकू सिंग आंतरराष्ट्रीय क्रिकेटशिवाय आयपीएलमधून देखील खूप कमाई करतो. त्याच्या संपत्तीमद्ये दिवसेंदिवस वाढच होत आहे. रिंकूला आयपीएलमध्ये मोठ्या प्रमाणात मागणी आहे. गेल्या हंगामात कोलकाता नाईट रायडर्सने त्याला मोठ्या रकमेमध्ये आपल्याकडे कायम ठेवून घेतले होते. ८ जून २०२५ रोजी लखनऊमध्ये प्रिया सरोजसोबत त्याचा साखरपुडा संपन्न झाला आहे. रिंकू सिंग सध्या यूपी टी२० लीगच्या तयारीत व्यस्त आहे.
मीडियाने दिलेल्या रिपोर्ट्सनुसार, रिंकू सिंगची एकूण संपत्ती सुमारे ९ कोटी रुपये इतकी आहे. क्रिकेट हे रिंकू सिंगच्या उत्पन्नाचा मुख्य स्रोत आहे. याशिवाय, तो जाहिरातींमधून देखील मोठ्या प्रमाणात कमाई करत असतो. त्याला बीसीसीआयकडून वार्षिक १ कोटी रुपये पगार देखील मिळतो. तो भारतीय बोर्डाच्या ग्रेड सी मध्ये करारबद्ध असलेला खेळाडू आहे. याशिवाय, त्याला आयपीएलमधून देखील मोठी कमाई करता येते. रिंकूला गेल्या हंगामात आयपीएल फ्रँचायझी कोलकाता नाईट रायडर्सकडून १३ कोटी रुपयांमध्ये रिंकूला कायम ठेवण्यात आले होते. याआधी रिंकूला केकेआरकडून ५५ लाख रुपये पगार देण्यात येत होता.
रिंकू सिंगची होणारी पत्नी प्रिया सरोजच्या एकूण संपत्तीबद्दल सांगायचं झालं, तर ती ११.२५ लाख इतकीच आहे. जी रिंकूच्या संपत्तीपेक्षा खूपच कमी आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये प्रियाने सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार, तिच्या दोन वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये ११.२५ लाख रुपये जमा आहेत. तसेच रिंकू सिंग एमआरएफ, एसजी, सीएट डायर्स आणि जेबीएल इंडिया सारख्या अनेक मोठ-मोठ्या कंपन्यांसाठी जाहिराती करत असतो. यातून त्याला दरवर्षी सुमारे ६० लाख रुपये मिळत असतात. रिंकू सिंगने अलीगडमध्ये एक आलिशान घर विकत घेतले आहे. ज्याची किंमत सुमारे ३ कोटी इतकी सांगितली जाते.
भारतीय संघातील रिंकू सिंगकडे सुमारे ६ लक्झरी कार असून त्याच्याकडे फोर्ड एंडेव्हर, मारुती स्विफ्ट, महिंद्रा स्कॉर्पिओ, टोयोटा इनोव्हा क्रेटा, मारुती सुझुकी ब्रेझा आणि रॉयल एनफील्ड बुलेट इतक्या गाड्या आहेत. फोर्ड एंडेव्हरची किंमत सुमारे ४० लाख इतकी असून इनोव्हा क्रेटाची किंमत सुमारे २५ लाख इतकी आहे.