शुभमन गिल(फोटो-सोशल मीडिया)
Shubhman Gilcha’s jersey cost 5.41 lakh rupees: भारत आणि इंग्लंड यांच्यात नुकतीच पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळवली गेली. या मालिकेत २-२ अशी बरोबरी साधण्यात आली. भारतीय संघाने युवा कर्णधार शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली शानदार कामगिरी केली. यामध्ये शुभमन गिलने तर आपल्या बॅटने धावांचा पाऊस पाडला. त्याने या मालिकेत १० डावांमध्ये ७५४ धावा केल्या. अशातच भारतीय कसोटी संघाचा कर्णधार शुभमन गिलने त्याची स्वाक्षरी केलेली जर्सी रेड फॉर रुथ चॅरिटीला दिली आहे. त्यानंतर या जर्सीचा सुमारे ५.४१ लाख रुपयांना लिलाव करण्यात आला. या दरम्यान, दोन्ही संघांच्या अनेक खेळाडूंच्या शर्ट, कॅप्स आणि इतर गोष्टींचा देखील लिलाव करण्यात आला.
अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी दरम्यान, रेड फॉर रुथ चॅरिटीमध्ये दोन्ही संघांच्या खेळाडूंनी स्वाक्षरी केलेले टी-शर्ट आणि कॅप्स तसेच बॅट, काही फोटो आणि हॉस्पिटॅलिटी तिकिटे यांचा समावेश होता. या दरम्यान, शुभमन गिलच्या स्वाक्षरी केलेल्या जर्सीने लिलावात सर्वाधिक किंमत मिळवली. त्याच वेळी, जसप्रीत बुमराह आणि रवींद्र जडेजाच्या जर्सी दुसऱ्या क्रमांकावर राहिल्या.
हेही वाचा : लॉर्ड्स ग्राउंडचा तुकडा करा खरेदी! चालून आली मोठी सुवर्णसंधी; मोजावे लागतील ‘इतके’ पैसे..
जसप्रीत बुमराह आणि रवींद्र जडेजाच्या जर्सीचा लिलाव किंमत सुमारे ४.९४ लाख रुपयांना झाला. त्यानंतर, केएल राहुलच्या जर्सीला सुमारे ४.७० लाख रुपये मिळाले. त्याच वेळी, लिलावात इंग्लंडचा खेळाडू जो रूटच्या स्वाक्षरी असलेल्या जर्सीला ४.४७ लाख रुपये मिळाले. त्यानंतर बेन स्टोक्सच्या जर्सीला सुमारे ४ लाख रुपये लागले.
तसेच यावेळी इंग्लंडचा दिग्गज फलंदाज जो रूटच्या कॅपला सर्वाधिक बोली लावण्यात आली. रूटच्या कॅपला ३.५२ लाख रुपये मोजण्यात आले. त्यानंतर, ऋषभ पंतच्या कॅपला देखील सुमारे १.७६ लाख रुपये बोली लागली. रेड फॉर रुथ चॅरिटीने या लोकांकडून २५ लाखांहून अधिक पैसे जमा केले.
भारत आणि इंग्लंडमधील २-२ अशा बरोबरीत राहिली. या मालिकेत भारताचा कर्णधार शुभमन गिलने कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा खेळूया केल्या. त्याने या सामन्यादरम्यान घातलेला शर्ट एका चॅरिटी लिलावात विकण्यात आला आहे. कर्करोगाने ग्रस्त कुटुंबांना मदत करण्यासाठी काम करणाऱ्या विशेष रेड फॉर रुथ मोहिमेअंतर्गत हा शर्टचा लिलाव करण्यात आला.
इंग्लंडमधील ऐतिहासिक लॉर्ड्स क्रिकेट मैदानावर झालेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यादरम्यान हा लिलाव आयोजित करण्यात आला होता. दरवर्षी, लॉर्ड्स टेस्टचा एक दिवस हा रेड फॉर रुथ संघटनेला समर्पित करण्यात येतो. ज्याची सुरुवात इंग्लंडचे माजी कर्णधार अँड्र्यू स्ट्रॉस यांनी त्यांच्या दिवंगत पत्नी रूथ स्ट्रॉस यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ केली होती. या दिवशी सर्व खेळाडू, प्रसारक आणि प्रेक्षक लाल कपडे घालून येतात.
रेड फॉर रुथ संस्थेकडून सांगण्यात आले की, गेल्या सहा वर्षांत त्यांनी ३,५०० हून अधिक कुटुंबांना दुःखावर मात करण्यास मदत केली गेली आणि १,००० हून अधिक कर्करोग काळजी तज्ञांना दुःखाचा सामना करण्यासाठी प्रशिक्षण देण्यात आले आहे. तथापि, लिलावात सर्वाधिक बोली २०१९ च्या विश्वचषक विजयाच्या क्षणाच्या कॅनव्हास पेंटिंगच्या प्रिंटसाठी लागली होती, ती सच्चा जाफरी यांनी बनवली होती. ज्याला ५,००० पौंड (सुमारे ५.८८ लाख रुपये) मध्ये खरेदी करण्यात आले होते.