फोटो सौजन्य - सोशल मीडिया
बाबर आझम : काही दिवसांपूर्वी झालेल्या बांग्लादेश विरुद्ध पाकिस्तान यांच्यामध्ये कसोटी मालिकेमध्ये पाकिस्तानचा बांग्लादेशने दारुण पराभव केला. त्यानंतर पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमच्या कर्णधारपदावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. या मालिकेत बाबर आझमची कामगिरी खूपच खराब झाली होती. त्यामुळे बाबर यांना टीकेलाही सामोरे जावे लागले होते. आता बाबरवर संकटाचे ढग दाटून आले आहेत. त्यामुळे आता बाबर आझमचे कर्णधारपद धोक्यात आहे कारण आता त्याच्याकडून कॅप्टन्सी पाकिस्तान क्रिकेट बोर्ड हिसकावून घेऊ शकतो. त्यामुळे आता पाकिस्तानचे कर्णधारपद कोणाकडे सोपवले जाणार याच्या चर्चा आता सुरु झाल्या आहेत.
बाबर आझमच्या जागी मोहम्मद रिझवानला कर्णधारपद मिळू शकते. नुकतेच चॅम्पियन्स एकदिवसीय चषक स्पर्धेसाठी संघ जाहीर करण्यात आले. यासोबतच कर्णधारांच्या नावांचीही घोषणा करण्यात आली पण त्यात बाबरचे नाव नव्हते. पाकिस्तानला नोव्हेंबरमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध वनडे आणि टी-20 मालिका खेळायची आहे. या मालिकेसाठी अद्याप संघ जाहीर झालेला नाही. हिंदुस्तान टाईम्समधील एका बातमीनुसार बाबरला कर्णधारपदावरून हटवले जाऊ शकते. त्यांच्या जागी मोहम्मद रिझवानला जबाबदारी मिळू शकते. संघाचे पांढऱ्या चेंडूचे मुख्य प्रशिक्षक गॅरी कर्स्टन यांनीही याबाबत पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे. बाबर खराब फॉर्मशी झुंजत आहे. बांगलादेशविरुद्ध तो सपशेल फ्लॉप झाला.