फोटो सौजन्य – X
आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक दिग्गज खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतले आहे. भारतीय क्रिकेटमधून विराट कोहली रोहित शर्मा त्याचबरोबर ऑस्ट्रेलिया संघामधून स्टीव्ह स्मिथ, श्रीलंकेचा देखील संघामधील अनेक खेळाडू हे निवृत्त झाले आहेत. आता वेस्टइंडीजचा स्टार आणि दिग्गज खेळाडू आंद्रे रसेल हा देखील आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचे निर्णय त्याने केला आहे. मीडियाच्या माहितीनुसार या संदर्भात मोठे अपडेट समोर आली आहे.
वेस्टइंडीजच्या संघाने नुकतीच झालेल्या कसोटी मालिकेमध्ये वेस्ट इंडिया संघाचा दारुण पराभव ऑस्ट्रेलियन संघाने केला. या मालिकेमध्ये फारच निराशाजनक कामगिरी केली. वेस्टइंडीज चा युवा खेळाडू निकलोस पुरनने देखील त्याचा एक वयाच्या 28 व्या वर्षी निवृत्ती घेऊन सर्वांनाच धक्का दिला होता. आंतरराष्ट्रीय स्तरावर वेस्ट इंडिजच्या संघाचा एकेकाळीत मोठा धबधबा राहायचा यामध्ये क्रिस गेल, ब्रावो, पोलार्ड त्याचबरोबर रसेल यांसारख्या दिग्गज खेळाडूंचा या संघामध्ये समावेश असायचा. क्रिस गेल, ब्रावो, रसेलसारखे खेळाडू जेव्हा फलंदाजीसाठी यायचे तेव्हा समोरच्या गोलंदाजांचा घाम निघत असेल.
ऑस्ट्रेलियाचा संघ सध्या वेस्ट इंडीज दौऱ्यावर आहे. वेस्टइंडीजची टीम पुढील मालिकाही ऑस्ट्रेलिया विरुद्ध t20 मालिका खेळणार आहे. मीडियाच्या माहितीनुसार असं म्हटले जात आहे की आंद्रे असेल निवृत्ती घेण्याच्या आधी वेस्ट इंडिजच्या संघासाठी आंतरराष्ट्रीय दोन सामने t20 मालिकेचा खेळताना दिसणार आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या आगामी मालिकेमध्ये वेस्ट इंडिजचा दिग्गज खेळाडू आंध्रे रसेल हा t20 मालिकेचे पहिले दोन सामने खेळताना दिसणार आहे.
🚨 ANDRE RUSSELL SET TO ANNOUNCE RETIREMENT FROM INTERNATIONAL. 🚨
– Russell to play the 2 T20is Vs Australia and then retire. (Espncricinfo). pic.twitter.com/uBE2jOFAPm
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) July 16, 2025
आंद्रे रसेल बद्दल सांगायचे झाले तर त्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर तर कमाल केलीच आहे त्याचबरोबर त्याने इंडियन प्रीमियर लीग (IPL) मध्ये देखील त्याच्या कामगिरीने चाहत्यांची मन जिंकली आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर आंध्रे रसेल याने त्याच्या करिअरमध्ये तीनही फारमॅटमध्ये पदार्पण केले होते पण तो कसोटी क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करु शकला नाही. एकदिवसीय करिअरमध्ये 56 सामन्यांमध्ये 1034 धावा केल्या आहेत. T20 क्रिकेट करियर मध्ये त्याने आतापर्यंत 84 सामने खेळले आहेत यामध्ये त्याने 1078 धावा केल्या आहेत. आयपीएल मध्ये त्याने 2651 धावा केल्या आहेत.
ईएसपीएन क्रिकइन्फोच्या मते, रसेल ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-२० मालिकेत शेवटच्या वेळी वेस्ट इंडिजच्या जर्सीमध्ये खेळताना दिसणार आहे. रसेल जमैकामध्ये होणाऱ्या पहिल्या दोन टी-२० सामन्यांमध्ये खेळताना दिसेल. म्हणजेच २२ जुलै रोजी कांगारू संघाविरुद्ध होणारा दुसरा टी-२० सामनाही रसेलच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील शेवटचा सामना असेल. रसेलने फक्त फलंदाजीनेच नाही तर गोलंदाजीने देखील कमाली केली होती. त्याची गणना जगातील सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडूंमध्ये केली जाते.