फोटो सौजन्य – X (BCCI)
India vs England first ODI match report : भारतीय महिला संघाची 16 जुलैपासून एक दिवसीय मालिकेला सुरुवात झाली आहे. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली भारताच्या संघाने पहिल्या सामन्यात चांगली कामगिरी केली. यामध्ये इंग्लंडच्या संघाने पहिले दोन विकेट्स लवकर गमावले होते. भारताच्या संघाने मालिकेच्या पहिल्या सामन्यात विजय मिळवून पहिला विजय नावावर नोंदवला आहे. भारत विरुद्ध इंग्लंड या मालिकेत भारताच्या संघाने 1-0 अशी आघाडी घेतली आहे. इंग्लंडच्या संघाने पहिले फलंदाजी करत सहा विकेट्स कमावत 258 धावा केल्या होत्या.
इंग्लंडच्या फलंदाजी बद्दल सांगायचे झाले तर एलिस डेविडसन हिने अर्धशतक झळकावले. तिने ८३ चेंडूंमध्ये 53 धावा केल्या. लॅब हिने संघासाठी 39 धावांची खेळी खेळली. टीम इंडियाने प्रतिउत्तरात सहा विकेट्स गमावून 49 व्या ओव्हर मध्येच 262 धावा केल्या. एकदिवसीय विश्वचषक तोंडावर असताना भारताचा संघ चांगली कामगिरी करत आहे. या सामन्या दोन्ही संघांच्या खेळाडूंची कामगिरी कशी राहिली यासंदर्भात सविस्तर जाणून घ्या.
A cracker of a chase from #TeamIndia to win the ODI series opener by 4 wickets! 👌 👌
Scorecard ▶️ https://t.co/kZOiqewbWP#ENGvIND pic.twitter.com/E1I3igW0R7
— BCCI Women (@BCCIWomen) July 16, 2025
भारतीय संघाच्या फलंदाजी बद्दल सांगायचे झाले तर भारताच्या संघाने पहिला विकेट लवकर गमावला होता. स्मृती मानधना तिने संघासाठी 28 धावांची खेळी खेळली. तर प्रतिका रावल हिने देखील महत्त्वाचे योगदान दिले. प्रतिका रावल हिने संघासाठी 36 धावा केला यामध्ये तिने तीन चौकार मारले. हरलीन देओल आणि हरमनप्रीत कौर या दोघेही मोठी खेळ खेळू शकल्या नाही.
T20 Tri-series : टी-२० तिरंगी मालिकेत न्यूझीलंडचा विजयारंभ; दक्षिण आफ्रिकेचा २१ धावांनी पराभव
हरलीन देओल हिने संघासाठी 27 धावा केल्या तर हरमनप्रीत कौर हिने 17 धावांची खेळी खेळली आणि विकेट गमावली. जेमिमा रोड्रिक्स आणि दीप्ती शर्मा या दोघींची भागीदारी संघासाठी फायदेशीर ठरली. दोघींनीही कमालीची कामगिरी केली आणि संघाला विजय मिळवून देण्यात मोलाचे योगदान दिले. जेमिमा रॉड्रिक्स हिने संघासाठी 48 धावांची खेळी खेळली. तर दीप्ती शर्मा हिने संघासाठी 62 धावा केल्या.
भारतीय महिला संघाच्या गोलंदाजी बद्दल सांगायचे झाले तर क्रांती गौड हिने संघाला २ विकेट्स मिळवुन दिले. तिने संघासाठी तिच्या पहिल्याच ओव्हरमध्ये विकेट्स घेतला आणि इंग्लडच्या सलामीवीर फलंदाजाला बाहेरचा रस्ता दाखवला. तर स्नेह राणा हिने प्रभावशाली गोलंदाजी केली आणि भारताच्या संघाच्या झोळीत २ विकेट्स मिळवुन दिले. चरणीच्या हाती १ विकेट लागला तर अमनज्योत कौर हिने संघाला १ विकेट शेवटच्या ओव्हरमध्ये मिळवुन दिला.