फोटो सौजन्य – X
ऑस्ट्रेलिया विरुद्ध वेस्ट इंडीज यांच्यामध्ये ३ सामन्याच्या कसोटी मालिकेला सुरुवात झाली आहे. या मालिकेच्या दुसऱ्या सामन्याला सुरुवात झाली आहे. पॅट कमिन्स हा त्याच्या गोलंदाजीसाठी त्याचबरोबर त्याच्या नेतृत्वासाठी त्याची ओळख आहे. त्याने त्याच्या नेतृत्वात ऑस्ट्रेलियाच्या संघासाठी अनेक मालिका त्याचबरोबर विश्वचषक जिंकले आहेत. वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्सने एक नवा इतिहास रचला. यासह कमिन्सने ६३ वर्षांचा विक्रम मोडला. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारा तो पहिला ऑस्ट्रेलियन कर्णधार ठरला.
वेस्ट इंडिज आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला कसोटी सामना बार्बाडोसमध्ये खेळला जात आहे. सामन्याच्या दुसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्सने रोस्टन चेसची विकेट घेत इतिहासाच्या पानांवर आपले नाव कोरले. तो कसोटीत कर्णधार म्हणून सर्वाधिक विकेट्स घेणारा पहिला ऑस्ट्रेलियन कर्णधार बनला. त्याने ६३ वर्षांचा जुना विक्रम मोडला. यापूर्वी हा विक्रम रिची बेनॉडच्या नावावर होता. आता पॅट कमिन्सने त्याला मागे टाकले आहे.
WI vs AUS : थर्ड अंपायरच्या निर्णयावरुन वाद, WI कोचही संतापले! नक्की प्रकरण काय? वाचा सविस्तर
याशिवाय, तो कर्णधार म्हणून सर्वाधिक कसोटी विकेट्स घेणारा जगातील दुसरा कर्णधार बनला. पाकिस्तानचा माजी कर्णधार इम्रान खान पहिल्या स्थानावर आहे. त्याने कर्णधार म्हणून कसोटी क्रिकेटमध्ये १८७ विकेट्स घेतल्या आहेत.
Pat Cummins surpasses Richard Benaud and is now only behind Imran Khan for the most Test wickets by a captain! 🇦🇺🤍✨#Australia #Tests #Cricket #PatCummins #Sportskeeda pic.twitter.com/tNqsRK4J1x
— Sportskeeda (@Sportskeeda) June 27, 2025
गेल्या काही वर्षांत ऑस्ट्रेलियासाठी दोन आयसीसी जेतेपदे जिंकून कमिन्सने एक आदर्श निर्माण केला आहे. २०२३ मध्ये एकदिवसीय विश्वचषक आणि जागतिक कसोटी अजिंक्यपद विजेतेपद जिंकले. याशिवाय, कमिन्सने त्याच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाला अॅशेस रिटेन्शन आणि घरच्या मैदानावर बॉर्डर-गावस्कर मालिकाही जिंकली आहे.
पहिल्या कसोटी सामन्याबद्दल बोलायचे झाले तर, ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव १८० धावांवर संपला. प्रत्युत्तरादाखल, वेस्ट इंडिजचा पहिला डाव १९० धावांवर संपला. वेस्ट इंडिजला १० धावांची आघाडी मिळाली. त्याच वेळी, ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावात चार विकेट गमावल्यानंतर ९२ धावा केल्या आहेत.