Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

WI vs SCO, ICC T20 World Cup 2026 : W,W,W…शेफर्डच्या हॅट-ट्रिकसह पंजासमोर स्कॉटलंड धाराशाही! वेस्ट इंडिजचा ३५ धावांनी विजय 

आज आयसीसी टी२० विश्वचषक २०२६ स्पर्धेतील दुसऱ्या सामन्यात कोलकाता येथील  ईडन गार्डन्सवर वेस्ट इंडिजने  स्कॉटलंडचा ३५ धावांनी पराभव केला. या सामन्यात वेस्ट इंडिजच्या शेफर्डने हॅट-ट्रिकसह ५ विकेट्स घेतल्या.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Feb 07, 2026 | 07:37 PM
WI vs SCO, ICC T20 World Cup 2026: W, W, W...Scotland collapses against the pace attack with Shepherd's hat-trick! West Indies win by 35 runs.

WI vs SCO, ICC T20 World Cup 2026: W, W, W...Scotland collapses against the pace attack with Shepherd's hat-trick! West Indies win by 35 runs.

Follow Us
Close
Follow Us:

ICC T20 World Cup 2026 : आयसीसी टी२० विश्वचषक २०२६ स्पर्धा आजपासून सुरुवात झाली. या मेगा स्पर्धेतील दुसऱ्या सामन्यात  कोलकाता येथील  ईडन गार्डन्सवर वेस्ट इंडिजने  स्कॉटलंडचा ३५ धावांनी पराभव केला. या सामन्यात टॉस गमावणाऱ्या वेस्ट इंडिज संघाने प्रथम फलंदाजी करत शिमरॉन हेटमायरच्या अर्धशतकाच्या जोरावर ५ गडी गमावून स्कॉटलंडसंघासमोर १८३ धावांचे लक्ष्य दिले होते. धावांचा पाठलाग करणारा स्कॉटलंड संघ रोमारियो शेफर्डच्या ५ विकेट्समुळे १८.५ षटकात १४७ धावांवर गारद झाला.

हेही वाचा : IND vs USA, T20 World Cup 2026 : टी-२० विश्वचषकापूर्वी सूर्याआर्मी सिद्धिविनायकाच्या भेटीला! विजयासाठी जोडले बाप्पासमोर हात

टॉस गामावणाऱ्या वेस्ट इंडिज संघाने प्रथम फलंदाजी करत ५ गडी १८२ धावा केल्या. वेस्ट इंडिजकडून शिमरॉन हेटमायरने ३६ चेंडूत ६४ धावा केल्या. त्याने आपल्या खेळीत २ चौकार आणि ६ षटकार लगावले. तसेच ब्रँडन किंग  ३० चेंडूत ४ चौकार आणि १ षटकारासह ३५ धावांचे योगदान दिले. शेर्फेन रदरफोर्डने आक्रमक खेळ दाखवत १३ चेंडूत २६ धावा  केल्या. स्कॉटलंडकडून ब्रॅड करीने २ विकेट्स घेतल्या, तर सफ्यान शरीफ, मायकेल लीस्क आणि ऑलिव्हर डेव्हिडसन, यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.

धावांचा पाठलाग करायला उतरेलल्या स्कॉटलंड संघाची सुरुवात चांगली झाली नाही. संघाच्या ३७ धावांवर ३ विकेट्स गेल्या.जॉर्ज मुन्से १९ धावा,  ब्रँडन मॅकमुलन १४ धावा, मायकेल जोन्स १ धावा करून झटपट माघारी गेले. त्यानंतर कर्णधार रिची बेरिंग्टन आणि  टॉम ब्रुस  या दोघांनी ७८ धावांची भागीदारी रचून संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. ४२ चेंडूत ६९ धावांची गरज होती आणि स्कॉटलंड सामना जिंकण्याच्या स्थितीत आहे असे वाटत होते. पण होल्डरने बेरिंग्टनला बाद केले आणि त्यानंतर ११५/४ वरून स्कॉटलंडचा संघ पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळला.

Romario Shepherd snaps the first hat-trick of #T20WorldCup 2026 🔥 Follow his exploits at the tournament LIVE, broadcast details 📺 https://t.co/NPykWM6SBq pic.twitter.com/LyaItIp6lc — ICC (@ICC) February 7, 2026

शेफर्डने हॅट-ट्रिक घेऊन  आणि सामना लवकरच संपला. रिची बेरिंग्टन ४२ धावा करून बाद झाला तर आणि  टॉम ब्रुस ३५ धावांवर माघारी गेला. मार्क वॉट ११,सफ्यान शरीफ ०, मायकेल लीस्क ०, ऑलिव्हर डेव्हिडसन ० धावांवर बाद झाले. तर ब्रॅड करी २ धावांवर नाबाद राहिला. वेस्ट इंडिजकडून रोमारियो शेफर्डने सर्वाधिक ५ विकेट्स घेतल्या. तर जेसन होल्डरने ३ विकेट्स काढल्या. तसेच   गुडाकेश मोती आणि  शमार जोसेफ यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली. परिणामी वेस्ट इंडिजने ३५ धावांनी विजय मिळवत स्पर्धेत विजयी सुरवात नोंदवली.

हेही वाचा : U19 World Cup Final : वैभव सूर्यवंशीला अटक करा! क्रिकेट मैदानावर हिंसाचार केल्याप्रकरणी कारवाईची मागणी; वाचा सविस्तर

स्कॉटलंड प्लेइंग इलेव्हन : जॉर्ज मुन्से, मॅथ्यू क्रॉस (यष्टीरक्षक), ब्रँडन मॅकमुलन, मायकेल जोन्स, टॉम ब्रुस, रिची बेरिंग्टन (कर्णधार), मायकेल लीस्क, ऑलिव्हर डेव्हिडसन, मार्क वॉट, ब्रॅड करी, सफ्यान शरीफ

वेस्ट इंडिज प्लेइंग इलेव्हन: ब्रँडन किंग, शाई होप (यष्टीरक्षक/कर्णधार), शिमरॉन हेटमायर, रोव्हमन पॉवेल, शेर्फेन रदरफोर्ड, जेसन होल्डर, रोमारियो शेफर्ड, अकील होसेन, मॅथ्यू फोर्ड, गुडाकेश मोती, शमार जोसेफ

Web Title: Wi vs sco scotland bowled out by shepherds hat trick west indies win by 35 runs

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 07, 2026 | 07:37 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.