टी-२० विश्वचषकापूर्वी सूर्याआर्मी सिद्धिविनायकाच्या भेटीला(फोटो-सोशल मीडिया)
Indian team players visit Siddhivinayak Temple : टी-२० विश्वचषक स्पर्धेत आज भारत आणि अमेरिका वानखेडे स्टेडियमवर आमनेसामने येणार आहेत. या सामान्याने भारतीय संघ आपल्या टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या मोहिमेला सुरुवात करणार आहे. या सामन्याआधी टीम इंडियाचे सदस्य आणि सहाय्यक कर्मचारी श्री सिद्धिविनायक मंदिराला भेट देऊन भगवान गणेशाचे आशीर्वाद घेतले आहे.
या वेळी फिरकी जोडी कुलदीप यादव आणि वरुण चक्रवर्ती यांनी संघाचे क्षेत्ररक्षण प्रशिक्षक दिलीप यांच्यासह श्री सिद्धिविनायक मंदिराला भेट दिली आहे. मंदिराच्या अधिकाऱ्यांनी त्यांना प्रत्येकी स्मृतिचिन्ह भेट देऊन सत्कार केला. त्याआधी गुरुवारी मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्याकडून श्री सिद्धिविनायक मंदिराला भेट देण्यात आली होती. आज अमेरिकेविरुद्धचा पहिला सामना जिंकून टी-२० विश्वचषकाची सुरुवात करण्यासाठी प्रयत्नशील असणार आहे. २०२६ च्या टी-२० विश्वचषकाच्या गट अ मध्ये भारताचा समावेश करण्यात आला आहे, ज्यामध्ये पाकिस्तान, नामिबिया, नेदरलँड्स आणि अमेरिका या संघांचा देखील समावेश आहे.
भारतीय संघ आज ७ फेब्रुवारी रोजी अमेरिकेविरुद्ध पहिला सामना खेळणार आहे. त्यानंतर १२ फेब्रुवारी रोजी नामिबियाविरुद्ध,तर १५ फेब्रुवारी रोजी भारत आणि पाकिस्तान यांच्यात एक हाय-व्होल्टेज सामना होण्याची शक्यता आहे. १८ फेब्रुवारी रोजी भारताचा सामना नेदरलँड्सविरुद्ध होणार आहे.
टी-२० स्वरूपात भारत आणि अमेरिका फक्त एकदाच आमनेसामने आले आहेत. २०२४ च्या विश्वचषकात भारता आणि अमेरिका संघ भिडले होते. हा सामना भारताने ७ विकेटने आपल्या खिशात टाकला होता. प्रथम फलंदाजी करताना अमेरिकेने ११० धावा केल्या होत्या. भारताने हे लक्ष्य सहज पूर्ण केले. तथापि, अमेरिका निश्चितच भारतासमोर आव्हान उभे करण्याचा प्रयत्न करेल. त्यामुळे हा सामाना रोमांचक होणीयकी शक्यता आहे.
भारत संभाव्य इलेव्हन : इशान किशन (यष्टीरक्षक), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), हार्दिक पंड्या, शिवम दुबे, रिंकू सिंग, अक्षर पटेल (उपकर्णधार), वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह/मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग
यूएसए संभाव्य इलेव्हन : अँड्रिज गॉस, सैतेजा मुक्कल्ला, शायन जहांगीर, मोनांक पटेल (कर्णधार आणि यष्टिरक्षक), मिलिंद कुमार, हरमीत सिंग, शुभम रांजणे, संजय कृष्णमूर्ती, मोहम्मद मोहसीन, शाडली व्हॅन शाल्क्विक, सौरभ नेत्रावलकर






