SRH owner to tie the knot! Who charmed Kavya Maran? Read the love story..
Kavya Maran to get married : आयपीएल संघ सनरायझर्स हैदराबादची मालकीण आणि व्यावसायिक महिला काव्या मारन नेहमीच चर्चेत असते. आता देखील ती चर्चेत आली आहे. आता ती काही क्रिकेट किंवा तिच्या हैदराबाद संघाबाबत चर्चेत आलेली नाही. आता ती तिच्या खाजगी आयुष्याबाबत चर्चेत आली आहे. काव्या मारन लग्न करणार असल्याची माहिती समोर आली आहे.
मीडिया रिपोर्ट्सवर विश्वास ठेवायचा झाला तर, काव्या मारनचे नाव सध्या दक्षिण चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक अनिरुद्ध रविचंदरसोबत जोडले जाऊ लागले आहे. अशी माहिती समोर आली आहे की, दोघांमधील जवळीक बऱ्याच काळापासून वाढत असून आता हे नाते लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. दोघेही बऱ्याच काळापासून एकमेकांना डेट करत असून अनेक वेळा एकत्र दिसून आले आहेत.
एका वृत्तामुळे या अफवांना आणखी बळ मिळत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अनिरुद्धचे काका असलेले दक्षिण चित्रपटसृष्टीचे मेगास्टार रजनीकांत यांनी हे नाते गांभीर्याने पुढे नेण्याची जबाबदारी घेतली आहे. असे सांगितले जात आहे, की रजनीकांतकडून दोघांच्या पालकांना वैयक्तिकरित्या भेटून या लग्नाबद्दल चर्चा करण्यात आली आहे. अशा परिस्थितीत, आता लवकरच काव्या आणि अनिरुद्धच्या लग्नाची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
काव्या मारनबद्दल सांगायच झाल्यास, ती सन नेटवर्कच्या मालक कलानिधी मारन यांची मुलगी आहे. देशातील सर्वात श्रीमंत व्यावसायिक महिलांपैकी ती एक आहे. वृत्तानुसार, काव्याची वैयक्तिक संपत्ती सुमारे ४०९ कोटी रुपये असल्याचे समजते. तर तिच्या वडिलांची संपत्ती १९,००० कोटी रुपयांपेक्षा अधिक आहे.
हेही वाचा : WTC 2025 Final : दक्षिण आफ्रिकेचा विजय तर दुसऱ्या दिवशीच निश्चित! Aiden Markram ची खेळी केवळ एक औपचारिकता..
काव्या मारनसोबत नाव जोडल्या जाणाऱ्या अनिरुद्ध रविचंदरबद्दल सांगायचे झाल्यास, रविचंदर दक्षिण इंडस्ट्रीतील टॉप संगीत दिग्दर्शकांपैकी एक आहे. त्याला ‘व्हाय दिस कोलावेरी दी’ या गाण्याने मोठी प्रसिद्धी दिली होती. त्यानंतर त्यांनी ‘जवान’, ‘लियो’, ‘जैलर’, ‘विक्रम’ आणि ‘देवरा’ सारख्या ब्लॉकबस्टर चित्रपटांमध्ये संगीत दिले आहे. आता तो लवकरच विजय देवरकोंडाच्या ‘किंगडम’ या चित्रपटात देखील दिसू शकतो.