साऊथ आफ्रिका टीम(फोटो-सोशल मीडिया)
WTC 2025 Final : दक्षिण आफ्रिकेच्या संघाने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाला पराभूत करून विजेतेपदावर नाव कोरले आहे. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा स्टार सलामीवीर एडेन मार्करामने एक अविश्वसनिय खेळी खेळली. त्याने २०७ चेंडूचा सामना करत १३६ धावा केल्या. त्याच्या खेळीने संघाचा विजय सहज केला. परंतु, असे असून देखील या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा विजय हा ऑस्ट्रेलियाच्या डावामध्येच निश्चित झाला असल्याचे समोर आले आहे.
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज लुंगी एनगिडीने ऑस्ट्रेलियाचा स्टार फलंदाज स्टीव्ह स्मिथला माघारी धाडले. दुसऱ्या डावात स्मिथला १३ धावांवर एलबीडब्ल्यू बाद देण्यात आले. हा प्रकार गुरुवार, १३ जून रोजी खेळच्या दुसऱ्या दिवसाच्या शेवटच्या सत्रात घडला. पहिल्या फलंदाजीत खराब कामगिरी केल्यानंतर, कागिसो रबाडाने चहापानाच्या ब्रेकपूर्वी दोन विकेट काढून दक्षिण आफ्रिकेला पुन्हा खेळात परत आणले. मार्को जॅन्सनने मार्नस लाबुशेनला झटपट बाद करून ऑस्ट्रेलियावर दबाव आणला. पहिल्या डावात अर्धशतक ठोकून स्मिथने संघाच्या धाव संखेत महत्त्वाचे योगदान दिले.
प्रथम लुंगी एनगिडीने स्मिथला एलबीडब्ल्यू करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्याने सतत स्टंपवर चेंडू टाकण्यास सुरवात केली.परंतु, त्याला एकही बळी मिळवता आला नाही. स्मिथने १९ व्या षटकाचा शेवटचा चेंडू चुकवला आणि चेंडू थेट जाऊन पॅडवर आदळला. स्मिथला वाटले की चेंडू आत येईल, परंतु तसे घडले नाही. सुरुवातीला पंचांनी दक्षिण आफ्रिकेचे अपील स्वीकारले नाही, परंतु एनगिडीने स्वतः अपील केले. त्यानंतर कर्णधार टेम्बा बावुमाने पहिल्या डावातील चूक टाळली. त्याने डीआरएस घेण्याचा निर्णय घेतला आणि स्मिथ बाद झाल्याचे दिसून आले. पहिल्या डावात स्मिथने एनगिडीला चांगलेच धुतले होते, त्याच्या १० चौकारांपैकी त्याने एनगिडीच्या चेंडूंवर तीन चौकार लगावले होते. स्मिथची विकेट पडल्यानंतर ऑस्ट्रेलियन संघ चांगलाच अडचणीत आलेला दिसून आला.
हेही वाचा : पाकिस्तानला मोठा झटका! आणखी एका प्रशिक्षकाचा संघाला टाटा, बाय-बाय; PCB चा वाद चव्हाट्यावर..
ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका या दोन संघात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामना पार पडला. सगळ्या क्रीडा जगताच्या नजरा या फायनल सामान्याकडे लागून होत्या. साऊथ आफ्रिकेने हा सामना ५ विकेट्सने जिंकून इतिहास रचला आहे. १९९८ नंतर पहिल्यांदा आयसीसीची स्पर्धा जिंकली आहे. ऑस्ट्रेलियाच्या २८१ च्या टार्गेटला साऊथ आफ्रिका संघाने एडन मारक्रमच्या १३६ धावांच्या जोरावर पूर्ण केले आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२५ चे जेतेपद आपल्या नावावर केले आहे. एडण मारक्रम आणि साऊथ आफ्रिका संघाचा कर्णधार टेंबा बवुमा ही जोडी या विजयाचे शिल्पकार ठरले आहेत.
.