फोटो सौजन्य : IndianPremierLeague
IPL 2025 Winner Prize Money : आयपीएल फायनल 2025 चा सामना सुरु व्हायला काही तास शिल्लक राहिले आहेत. हा सामना 7.30 मिनिटांनी सुरु होणार आहे, यासाठी भारतीय क्रिकेट चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. पंजाब किंग्सच्या संघाने मुंबई इंडीयन्सचा पराभव करुन फायनलमध्ये स्थान पक्के केले आहे. तर राॅयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या संघाने क्वालिफायर १ मध्ये पंजाब किंग्सचा पराभव केला होता. आता जो संघ आज विजयी होणार आहे तो पहिल्यांदाच हातामध्ये ट्राॅफी घेणार आहे. या सामन्यापूर्वी चाहत्यांच्या नजरा स्पर्धेच्या बक्षीस रकमेवर आहेत.
आयपीएल २०२५ च्या बक्षीस रकमेत बदल करण्याबाबत बीसीसीआयकडून अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. अशा परिस्थितीत, विजेत्या आणि उपविजेत्या संघाला २०२२ पासून सुरू असलेली बक्षीस रक्कम समान मिळेल असे मानले जात आहे. यांसदर्भात बीसीसीआयने कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. बक्षीस रकमेत शेवटचा बदल तीन वर्षांपूर्वी करण्यात आला होता. तेव्हापासून विजेत्याला २० कोटी रुपये आणि उपविजेत्या संघाला १३ कोटी रुपये मिळतात.
RCB VS PBKS : गोलंदाज करणार कमाल की फलंदाजांची चालणार मनमानी? वाचा अहमदाबादच्या खेळपट्टीचा अहवाल
क्वालिफायर-२ मध्ये बाहेर पडणाऱ्या संघाला ७ कोटी रुपये आणि एलिमिनेटर सामना हरणाऱ्या संघाला ६ कोटी रुपये मिळतात. यावेळी मुंबई इंडियन्स क्वालिफायर-२ मध्ये पराभूत झाले, तर गुजरात टायटन्स एलिमिनेटरच्या पुढे जाऊ शकले नाहीत.
पंजाब किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यामध्ये चुरशीची लढत पाहायला मिळणारा आहे. क्वालिफायर १ मधे पंजाबचा बंगळुरू विरुद्ध पराभव झाल्यानंतर संघाला क्वालिफायर २ चा सामना खेळावा लागणार आहे. श्रेयस अय्यर याने मागील सामन्यात त्याचा फॉर्म परत मिळवला आहे आता तो आजच्या फायनलच्या सामन्यांमध्ये कशी कामगिरी करेल हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
📍 Narendra Modi Stadium, Ahmedabad
📸 The 2⃣ captains gear up for Final Face-off ❤️
𝗔𝗥𝗘. 𝗬𝗢𝗨. 𝗥𝗘𝗔𝗗𝗬? ⏳ #TATAIPL | #RCBvPBKS | #Final | #TheLastMile | @RCBTweets | @PunjabKingsIPL pic.twitter.com/WG0cS0iTVv
— IndianPremierLeague (@IPL) June 2, 2025
दुसऱ्या टोकाला आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचा स्टार फलंदाज विराट कोहली असणार आहे मागील सामन्यात पंजाब विरुद्ध तो स्वस्तात बाद झाला होता पण त्याने संघासाठी सातत्याने कमालीचा खेळ दाखवला आहे. फिल सॉल्ट याने मागील सामन्यात अर्धशतक पंजाब किंग्सविरुद्ध झळकावले होते त्यामुळे त्याच्या कामगिरीवर चाहत्यांची नजर असणार आहे.