फोटो सौजन्य : IndianPremierLeague
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध पंजाब किंग्स खेळपट्टीचा अहवाल : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध पंजाब किंग्स यांच्यामध्ये महाअंतिम सामना रंगणार आहे हा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी मैदानावर खेळवला जाणार आहे. पंजाब किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू हे दोन संघ आमनेसामने असणार आहेत. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ हा रजत पाटीदारच्या नेतृत्वात मैदानात उतरणार आहे. तर सलग दुसऱ्यांदा श्रेयस अय्यर फायनलचा सामना कर्णधार म्हणून खेळताना दिसणार आहे.
श्रेयस अय्यरने इंडियन प्रीमियर लीग 2024 मध्ये कमालीची खेळ दाखवत कोलकाता नाईट रायडर्स रायडर्सला आयपीएलची ट्रॉफी मिळवून दिली होती तर या सीझनमध्ये तो पंजाबच्या संघाला फायनलमध्ये घेऊन आला आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी मैदानावर हा सामना खेळवला जाणार आहे. या आधी या मैदानावर क्वालिफायर २ चा सामना खेळवण्यात आला होता यामध्ये मुंबई इंडियन्सच्या संघाने २०३ धावा या मैदानावर केल्या होत्या. हे लक्ष्य पंजाब किंग्सच्या संघाने सहज पार केले आणि संघाने १ ओव्हर शिल्लक असताना ही लक्ष्य पूर्ण केले आणि फायनलमध्ये प्रवेश केला होता.
अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमची खेळपट्टी फलंदाजीसाठी खूपच अनुकूल राहिली आहे. आयपीएल २०२५ क्वालिफायर-२ मध्ये पाहिल्याप्रमाणे, जिथे मुंबई आणि पंजाब दोन्ही संघांनी २०० धावांचा टप्पा ओलांडला. मुंबईने २०३ धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल पंजाबने १९ व्या षटकात सहज लक्ष्य गाठले. आता अंतिम सामन्यातही उच्च धावसंख्या असलेला सामना पाहण्याची अपेक्षा आहे. नाणेफेक जिंकणारा कर्णधार प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेऊ शकतो, कारण या खेळपट्टीवर धावांचा पाठलाग करणे खूप फायदेशीर ठरले आहे.
इंडियन प्रीमियर लीग 2025 चा फायनलच्या सामन्यासाठी सर्वच क्रिकेट चाहते उत्सुक आहेत. या सामन्यात कोण विजय मिळवणार आणि कोणाच्या हाती ट्रॉफी लागणार हे जाणून घेण्यासाठी चाहत्यांना उत्सुकता लागली आहे. पण हा सामना कधी आणि कुठे मोफत पाहायला मिळणार हे जाणून घेणे देखील तेव्हढेच महत्वाचे आहे. पंजाब किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या दोन संघांमधील सामना हा टेलिव्हिजनवर पाहणाऱ्या प्रेक्षकांसाठी हा सामना स्टार स्पोर्ट्स चॅनेलवर तुम्हाला पाहायला मिळणार आहे. तर मोबाईलमध्ये पाहणारे क्रिकेट चाहते या सामन्याचे लाईव्ह स्ट्रिमिंग ही जिओहॉटस्टारवर व्हायला मिळणार आहे