
फोटो सौजन्य - indiancricketteam
भारत विरुद्ध श्रीलंका : भारतीय महिला क्रिकेट संघ सेमीफायनलमध्ये बांग्लादेश महिला संघाशी मुकाबला झाला. यामध्ये भारताच्या संघाने बांग्लादेशला उपांत्य फेरीमध्ये १० विकेट्सने पराभूत करून एकतर्फी विजय मिळवला. तर श्रीलंकेच्या संघाने पाकिस्तानला ३ विकेट्सने पराभूत केले आहे. आता या दोन्ही संघ आशिया महिला कपमध्ये भिडणार आहेत. भारतीय महिला क्रिकेट संघाने हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली आशिया कपमध्ये एकही सामना न गमावता अंतिम फेरीमध्ये प्रवेश केला आहे. अंतिम सामना दोन्ही संघासाठी महत्वाचा आहे.
भारतीय संघाची आशिया महिला कपमधील कामगिरीवर नजर टाकली तर भारताचा संघाने अजुनपर्यत एकही सामना सामना गमावलेला नाही. पहिल्या सामन्यामध्ये टीम इंडियाने पाकिस्तानला पराभूत केले. त्यानंतर भारताच्या संघाने युएईच्या संघाने पराभूत करून सेमीफायनलचा मार्ग मोकळा केला आहे. त्यानंतर शेवटच्या साखळी सामन्यांमध्ये नेपाळला पराभूत करून उपांत्य फेरीमध्ये प्रवेश केला होता. काल भारताचा सामना बांग्लादेशसोबत झाला आणि संघाने या सामन्यामध्ये एकतर्फी विजय मिळवला.
श्रीलंका संघाची आशिया कपमधील कामगिरीबद्दल बोलायचं झालं तर श्रीलंकेच्या संघाने सुद्धा तीनही साखळी सामने आणि सेमीफायनलमध्ये पाकिस्तानच्या संघाला पराभूत करून अंतिम फेरीमध्ये प्रवेश केला आहे.
भारत विरुद्ध श्रीलंका सामना २८ जुलै रोजी आयोजित करण्यात आला आहे. हा सामना दुपारी ३.०० वाजता सुरु होणार आहे. भारताच्या संघाने आतापर्यत आशिया महिला कपचे सातवेळा जेतेपद मिळवले आहे. तर १ वेळा बांग्लादेशच्या संघाने जेतेपद मिळवले आहे.